पणजी :
देशाची एकात्मता बंधुभाव आणि परस्परांमधील प्रेम वाढावे यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या कन्याकुमारी ते कश्मीर यात्रेला देशभरातील महिला आणि युवकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत असून जाती-धर्मात फूट घालून सत्ता संपादनाची भाजपची रणनीती यापुढे अपयशी ठरणार आहे असे मत गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले आहे. मेहबूबनगर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रसार माध्यम प्रमुख जयराम रमेश, कॅप्टन उत्तम कुमार रेड्डी, मल्लू भट्टीविक्रमर्का, पंजाब राज्याचे प्रभारी हरीश चौधरी, कर्नाटकाचे माजी मंत्री कृष्णा बैरेगौडा उपस्थित होते. गिरीश चोडणकर पुढे म्हणाले की भाजपने काँग्रेससंबंधी केलेल्या अपप्रचार व संभ्रम भारत यात्रेतून दूर होत असून लोक मोठ्या संख्येने पक्षाकडे आकृष्ट होत आहेत.
देशभरातून काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार भाजपने बुद्धिबद केलेल्या व आतापर्यंत काँग्रेस विरोधक असलेले मतदारही मोठ्या संख्येने काँग्रेसकडे अपृष्ठ अकृष्ट होत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत चालणाऱ्या 3,650 किलोमीटर लांबीच्या भारत जोडो यात्रेसंबंधी बोलताना चोडणकरांनी उपस्थिताना राहुलजींनी अकरा वर्षाआधी 2011 साली यशस्वी केलेल्या किसान संदेश यात्रेची आठवण करून दिली.
सदर यात्रेतून सरकारकडून गरीब शेतकऱ्यांच्या बेकायदेशीररित्या संपादक केलेल्या जमिनी संपादनाविरोधात आवाज उठवला होता. परिणामी सरकारला जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे नवीन कायदे करणे भाग पडले. ज्यामुळे संपादित केला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य बाजार भाव मिळाला. राहुलजींच्या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आपण वेळोवेळी भाग घेणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेसचे माजी सरचिटणीस चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.