google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

सुरक्षित आरोग्य वीमाकरिता केअर हेल्थ इन्शुअरन्सकडून नवी योजना

देशातील अग्रगण्य आरोग्य आयुर्विमा कंपनी असलेल्या केअर हेल्थ इन्शुअरन्स कंपनीने अल्टीमेट केअर योजना जाहीर केली आहे. विविध आजारांच्या उपचारांत मदत करण्यासाठी अल्टीमेट केअर योजना मदत करेल. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही योजना ग्राहकांना सर्वसमावेशक सोयीसुविधांसह मदतीला धावून येईल. या योजनेचा लाभ घेतल्याने ग्राहकांना निरोगी आयुष्य जगता येईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला. 


अल्टीमेट केअर योजनेत ग्राहकांना त्यांच्या आजारांशी लढण्यासाठी व्यापक प्रमाणावर आरोग्य कव्हरेज उपलब्ध होईल. शिवाय मनीबॅक सुविधाही उपलब्ध असेल. मोफत कालावधी वर्षांतील आरोग्य आयुर्विमा योजनेचे ५ क्लेम केल्यावर कंपनी पहिल्या वर्षाचा बेस प्रीमीयम परत करेल. या योजनेत लॉयल्टी बूस्ट सुविधेचा समावेश करण्यात आला आहे. यातून ग्राहकांना अतिरिक्त विमा रक्कम मिळते ही रक्कम मोफत कालावधी वर्षांतील ७ क्लेमनंतर पहिल्या पॉलिसी वर्षाच्या एसआय मूल्याशी समान असते. यातील इन्फिनिटी बोनस लाभ एकत्रित बोनसला मर्यादित करत नाही. उलट दरवर्षी दाव्यांची परवा न करता एसआय मूल्याच्या शंभर टक्के बोनस देते. यात पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळा अमर्यादित उपलब्ध असतात. ग्राहकांना या योजनेत वेलनेस स्वरुपातील सवलत उपलब्ध असेल. ग्राहकांच्या नूतनीकरण प्रीमियमवर ३० टक्के सवलत उपलब्ध होईल.


केअर हेल्थ इन्शुअरन्सचे वितरण प्रमुख अजय शहा म्हणाले की, आजकालच्या आरोग्याविषयींच्या सोयीसुविधा पुरवताना ग्राहकांना सर्वसमावेशक आणि मजबूत आर्थिक सुरक्षितता पुरवणे महत्त्वाचे असते. या आर्थिक सुरक्षिततेमुळे अनपेक्षितरित्या उभ्या राहिलेल्या आपत्कालीन वैद्यकीय गरजा पूर्ण होतात. ग्राहकांचे निरोगी आयुष्य जपता येते. ग्राहकांना सर्वसोयीसुविधांनीयुक्त आर्थिक आरोगेय कवच पुरवण्याकरिता या योजनेत विविध तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. या तरतुदींचा लाभ घेतल्याने ग्राहकांना मानसिक आरोग्यही जपण्यास मदत होईल.


या पॉलिसीचा स्विकार केलेल्या लाभार्थ्यांना अनेक सुविधांचा लाभ घेता येईल. नव्याने पॉलिसी स्विकारलेल्या धारकांना वेलकम सवलतीच्या माध्यमातून प्रीमीयमवर ३० टक्के सूट मिळेल. यासह टर्म मल्टिप्लायर पॉलिसीत एकाच दाव्यासाठी अनेक वर्षांच्या पॉलिसीची वार्षिक विमा रक्कम गोळा होते. पहिल्या पॉलिसी नूतनीकरणावर प्रत्येकी २५० रुपयांचे दोन फार्मसी वाऊचर्स आणि मेडिवाऊचर्स देण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!