google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीक्रीडा

‘JSW’कडून ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताची शतकपूर्ती साजरी

ऑलिम्पिक चळवळीचे संस्थापक पियरे डी कौबर्टिन यांचे जीवन आणि त्यांचा वारसा सांगणाऱ्या तसेच या खेळांमध्ये भारताने 100 वर्षे पूर्ण केल्याच्या सन्मानार्थ रविवारी पॅरिसमध्ये प्रदर्शनाचे उद्घाटन करत जेएसडब्लू ग्रुपने ऑलिम्पिक दिन साजरा केला.

JSW फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संगीता जिंदाल आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टचे संस्थापक पार्थ जिंदाल यांच्यासमवेत आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख, सांस्कृतिक मंत्री मादाम रचिदा दाती, फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अश्रफ, पियरे डी कौबर्टिन फॅमिली असोसिएशनच्या अध्यक्षा, श्रीमती अलेक्झांड्रा डी. नॅवासेले आदी मान्यवर पॅरिसच्या 7 व्या ॲरोन्डिसमेंटच्या टाऊन हॉलमध्ये आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. पॅरिस 2024 समर पॅरालिम्पिक गेम्स संपेपर्यंत म्हणजेच सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू असेल.

याप्रसंगी बोलताना JSW फाऊंडेशनच्या अध्यक्षा  संगीता जिंदाल म्हणाल्या, “जेएसडब्ल्यू ग्रुप पॅरिसमधील जीनियस ऑफ स्पोर्ट प्रदर्शनात ‘ऑलिम्पिकमधील भारताची शतकपूर्ती’ या प्रदर्शनाला पाठिंबा देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या अनोख्या प्रदर्शनाद्वारे, आम्ही पियरे डी कौबर्टिन यांचे जीवन, वारसा आणि भारताच्या ऑलिम्पिकमधील उल्लेखनीय प्रवासाची आणि यशाची 100 वर्षे साजरी करतो. शांतता आणि मैत्रीच्या भावनेने लोकांना एकत्र आणत सीमा ओलांडून हे जग वेगळ्या पद्धतीने बदलण्याची क्षमता खेळामध्ये आहे, हा Pierre De Coubertin यांचा विश्वास अत्यंत योग्य आहे, आणि आम्ही देखील त्याच विश्वासावर काम करतो. 2024 ऑलिंपिक JSW गटासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. पॅरिसमधील हे प्रदर्शन तसेच टीम इंडियाला पाठिंबा देताना आमचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. या प्रयत्नांद्वारे आम्ही भारतातील क्रीडा संस्कृती आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या तसेच संवर्धन करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.”

'Celebrating India's Centenary in Olympic Games by JSW

पियरे डी कौबर्टिन फॅमिली असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात भारताचा गेल्या शतकातील ऑलिम्पिक प्रवास, भूतकाळात देशाला मिळालेले यश आणि भविष्यावर लक्ष ठेवून सुरू असलेले प्रयत्न यांच्या तपशीलवार माहितीचा समावेश आहे.

इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टचे संस्थापक  पार्थ जिंदाल म्हणाले, “पियरे डी कुबर्टिन कुटुंबासोबत भागीदारी हा आमचा सन्मान आहे. ऑलिम्पिक चळवळ आणि त्यातील भारताचे योगदान, हे खूप महत्त्वाचे आहे, असे आम्हाला वाटते. आम्ही जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेच्या उंबरठ्यावर आहोत आणि पॅरिस शहरात आणखी काही करण्याची JSW ची इच्छा होती. एक देश म्हणून आम्हाला पियरे डी कौबर्टिन यांचा आदर्श पुढे न्यायचा आहे. जग हे एक शांततामय ठिकाण असावे अशी आमची इच्छा आहे आणि यात खेळाची भूमिका खूप मोठी आहे.

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ऑलिम्पिक चळवळ पुढे नेणे हे JSW स्पोर्ट्सचे ध्येय आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या खेळांमध्ये टीम इंडियाचा भाग म्हणून सुमारे 30 क्रीडापटू इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टचे प्रतिनिधित्व करतील आणि प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेसोबतच ही संख्या अधिक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक शक्ती म्हणून भारताचा उदय स्पष्ट आहे. पण खेळातूनच देशाची सॉफ्ट पॉवर खऱ्या अर्थाने समोर येते, आणि यात आम्ही आमची भूमिका योग्यरित्या बजावू.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!