
भारताचा सलग दुसरा पराभव
कटक:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रविवारी पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा टी-20 सामनाही गमावला आहे.
कटक येथील बाराबती स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना 7 गडी राखून जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या सामन्यात भारताचा 4 गडी राखून जिंकला. पहिल्या T20 मध्ये भारताला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर आता ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कटकमध्ये विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या दुसऱ्या T20 मालिकेत 2-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकातच बाद झाला. यानंतर इशान किशन (21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 34 धावा) आणि श्रेयस अय्यरने (35 चेंडूत 40 धावा) दुसऱ्या विकेटसाठी 45 धावा जोडून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. इशानच्या सातव्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतल्याने भारताचा डाव फसला.