कोट्यवधी शेतकऱ्यांना सरकारची लाखाची भेट…
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही शेतकरी असाल तर आता तुम्हाला केंद्र सरकारकडून पूर्ण 3 लाख रुपये मिळत आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत. आता केंद्र सरकार (Government) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांची भेट देत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.
पीएम किसान योजनेव्यतिरिक्त, सरकार शेतकऱ्यांना KCC योजनेची सुविधा देत आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना लाखोंचा लाभ मिळत आहे. अर्थमंत्री सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी पीएम किसान सन्मानच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करण्याचे आदेश दिले होते.
देशातील सर्वात कमी व्याजदरात या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, KCC कर्जाच्या रकमेत सरकारकडून सबसिडीही जाहीर केली जाते.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजाने पैसे मिळतात. शेतीच्या कामात गरज पडेल तेव्हा बहुतांश शेतकरी त्यातून पैसे घेतात. शेतकऱ्यांना (Farmer) सावकारांच्या तावडीतून आणि चढ्या व्याजापासून वाचवण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली.
किसान क्रेडिट कार्ड योजनेत देशातील शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. जर शेतकऱ्याने कर्जाची रक्कम वेळेवर परत केली तर शेतकऱ्याला व्याजदरात 3 टक्के सूट दिली जाते.
म्हणजेच, कर्जाच्या रकमेवर फक्त 4 टक्के व्याज शिल्लक आहे. आगामी काळात देशातील सर्व पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.