google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

भारतातील डॉक्टरांसाठी ‘क्लिनिकल इंटेलिजन्स इंजिन’

नवी मुंबई :

आशियातील सर्वात मोठ्या आणि सर्वात विश्वासार्ह आरोग्य सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या अपोलो हॉस्पिटल्स समूहाने आज वैद्यकीय चिकित्साविषयक निर्णयांना समर्थन देणारे एक साधन, अपोलो क्लिनिकल इंटेलिजन्स इंजिन (CIE), बाजारात आणण्याची घोषणा केली, जे सर्व भारतीय डॉक्टरांसाठी अपोलो २४/७ च्या व्यासपीठावर वापरण्यासाठी खुले राहील. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मधील नवीनतम तंत्राचा वापर करून विकसित केलेले हे साधन निदानाची अचूकता, डॉक्टरांची उत्पादकता आणि रुग्णांचे समाधान या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी व एकाच वेळी देऊन भारतीय आरोग्य सेवेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.

अपोलो क्लिनिकल इंटेलिजन्स इंजिन (CIE) आरोग्यसेवेतील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्लेषण करून असे नमुने ओळखण्यास मदत करेल जे अन्यथा लक्षात आले नसते किंवा चुकले असते. संख्यात्मकदृष्ट्या इन्टेलिजन्स इंजिनच्या शब्दसंग्रहात १३०० हून अधिक परिस्थिती आणि ८०० लक्षणे आहेत, ज्यात ओपीडी मध्ये येणाऱ्या रोजच्या केसेसमधून ९५% भाग समाविष्ट आहे. अपोलोच्या ४० वर्षांचा डेटा, १००० डॉक्टरांच्या एकत्रित बुद्धिमत्तेचा वापर करून आणि या क्षेत्रातील संबंधित तज्ज्ञ व समवयस्कांच्या कडून पुनरावलोकन केलेल्या नियतकालिकांमधील समर्थन देणाऱ्या माहिती यासर्वांचा वापर करून १०० हून अधिक अभियंत्यांनी तयार केलेले हे इंटेलिजन्स इंजिन जगातील सर्वात मोठ्या कनेक्टेड हेल्थ डेटालेक पैकी एक असेल, जे काही जागतिक शैक्षणिक संस्थांद्वारे तपासले व प्रमाणित केले गेले आहे. ५०० हून अधिक अपोलो डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या अपोलो हॉस्पिटलमधीलच टीम द्वारे तयार केलेले, आणि वेळोवेळी पुनरावलोकन केले जाणारे ज्ञानाच्या आधाराने समर्थित आहे.

डॉ. प्रताप सी. रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स समूह म्हणाले, “भारताला खऱ्या अर्थाने निरोगी बनवण्यासाठी आणखी काही करण्याची माझी इच्छा नेहमीच असते. विशेषतः जेव्हा आपण मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांच्या (NCDs) अक्षरशः मोठया प्रलयाला सामोरे जात आहोत. जेव्हा माझ्या टीमने क्लिनिकल इंटेलिजन्स इंजिनची संकल्पना मांडली तेव्हा मला माहीत होते की, ही एक अशी उपलब्धी आहे जी आरोग्य सेवेमध्ये क्रांती घडवून आणेल. सीआयइ हे केवळ अपोलो पुरते मर्यादित राहुच शकत नाही तर हे संपूर्ण भारतातील डॉक्टरांशी सामायिक करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक पात्र, प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना अपोलो सीआयइ प्रदान करताना मला अतिशय आनंद होत आहे. मला विश्वास आहे की, यामुळे एकत्रितपणे, भौगोलिक, प्रादेशिक किंवा उत्पन्नाच्या वर्गीकरणापासून स्वतंत्र वेगळे राहून वेळेवर व अधिक अचूक निदानाद्वारे आम्ही भारतीयांना जास्त निरोगी बनवण्यास सक्षम होवू.”

अपोलो-सीआयइ संस्थांना सुरक्षित, सिम्प्टम चेकर (Symptom Checker) च्या माध्यमातून वैद्यकीय दृष्ट्‍या प्रमाणित आरोग्य संवादांद्वारे आणि या तज्ज्ञ चिकित्सा व निदानासंबंधी ज्ञानप्रणालीसह सुसज्ज डॉक्टर्सच्या द्वारे मल्टिचॅनेल उपलब्ध करून देत असल्यामुळे आरोग्य सेवा प्रदात्यांच्या कामकाजाचे प्रमाण देखील वाढते. अपोलो सीआयइ वापरकर्त्याच्या लक्षणांचे विश्लेषण करते, कारणे काय असावीत हे ठरवते आणि पुढील सर्वोत्तम कृतीची शिफारस देखील करते. अपोलो सीआयइ हे स्वयंशिक्षित इंजिन आहे जे डॉक्टरांना ज्ञानाच्या महासागरापर्यंत पोहोचवते. क्लिनिकल पेपर्सच्या परिणामांमधून सीआयइ ६ लाखांहून अधिक नवीन घडामोडींचा विचार करण्यास सक्षम झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!