google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘सदानंद तानावडेंनी केला ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा अपमान’

पणजी :

काँग्रेसचा जाहीरनामा पाहून हादरलेल्या भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा अपमानास्पद वक्तव्य करून त्यांची मानहानी केली आहे. गोव्याला आंदोलनांचा इतिहास आहे. भाजपच्या नेतृत्वाने भाजपविरोधी लाटेची दखल घ्यावी आणि गोमंतकीयांचा अपमान करणे बंद करावे, असा इशारा काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमूख  अमरनाथ पणजीकर यांनी दिला आहे.


काँग्रेसच्या जाहीरनाम्याची ज्येष्ठ नागरिक आणि सामाजीक कार्यकर्त्यांची मानसिकता अशी तुलना करणाऱ्या भाजप अध्यक्षांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी भाजपच्या उद्दामपणाला जनताच धडा शिकवेल असे प्रत्युत्तर दिले.


गोव्याला आंदोलनांचा इतिहास आहे. गोवा क्रांती आंदोलन, राजभाषा आंदोलन, विद्यार्थ्यांना ५० टक्के बस सवलत, घटकराज्याचा दर्जा, प्रादेशिक आराखडा रद्द करणे या सर्व गोष्टी सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनातून साध्य झाल्या. एनजीओ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गोव्यासाठी मोठे योगदान दिले आहे. 2024 मध्ये ‘भाजप हटाओ आंदोलन’ सुरू झाले आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.


भाजपने लक्षात घेतले पाहिजे की त्यांचे पाच वेळचे खासदार श्रीपाद नाईक ज्यांनी केंद्रीय मंत्रीपदेही उपभोगली आहेत ते प्रत्यक्षात जनसंपर्काच्या आणि वस्तुस्थिती समजण्याच्या पलिकडे गेले आहेत. मोपा विमानतळ आणि आयुष हॉस्पिटलमध्ये किती गोमंतकीयांना नोकऱ्या मिळाल्या त्याची आकडेवारी देण्यासही ते अपयशी ठरले, असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला.

म्हापसा अर्बन आणि मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांच्या लिक्विडेशन सारख्या मुद्द्यांवर भाजप सार्वजनिक चर्चा का टाळत आहे? खाण आणि म्हादईच्या चर्चेला भाजप का घाबरतोय? बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावर चर्चा करण्यास भाजप का टाळत आहे? असे सरळ प्रश्न अमरनाथ पणजीकर यांनी सदानंद तानावडेना विचारुन उत्तर देण्याची मागणी केली आहे.


काँग्रेसचा जाहीरनामा हा गोव्याच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. जाहीरनाम्यातील 21 मुद्यांनी काँग्रेस गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करेल असा स्पष्ट संदेश गोमंतकीयांना मिळाला आहे. आमची गॅरंटी व्होरंटीसह आहे, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!