मुख्य प्रबंधकावर दमदाटी करणाऱ्या ‘त्या’ इसमावर होणार कारवाई
सातारा:
सातारा जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर पुरवठा विभागाचे ठेकेदार फिरोज पठाण यांनी केंद्र सरकारच्या अन्न विभागाचे मुख्य प्रबंधक आशुतोष सिंग यांना अरेरावीची भाषा करुन दमदाटी करून शासकीय कार्यालयात दहशत माजवली यासंबंधी जिल्हाधिकारी यांना पत्रकारांनी पत्रकार परिषदेत विचारले असता, याप्रकरणी सविस्तर माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
तर जिल्हाधिकारी यांनी शहरातील आवश्यक असलेल्या सीसीटीव्ही संदर्भात लवकरच निर्णय घेऊन चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कास पठारावरील घेण्यात आलेल्या कास मोहत्सवातील चुका लक्षात घेऊन पुढच्या वेळी योग्य नियोजन करुनच हा मोहत्सव अजून चांगला करु असे सांगितले तर कास पठारावरील गावांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा या हेतूने आम्ही गाव पर्यटन योजना करण्याचा विचार करत असून लवकरच यासंदर्भात आराखडा तयार करून नवीन योजना राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.