google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

दाबोळी लवकरच घोस्ट एअरपोर्ट होणार : युरी

मडगाव :

भाजपकडून लोकसभा पराभवाचा बदला?  एरोफ्लोटने दाबोळी विमानतळावरुन आपल्या सर्व विमानसेवा मोपा येथे हलवण्याची घोषणा केली. असंवेदनशील भाजप सरकारचा दक्षिण गोव्याला आणखी एक धक्का. दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करुन दाबोळी विमानतळ लवकरच घोस्ट एअरपोर्ट होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यापुढे केवळ आश्वासने देत राहणार की कृती करणार?, असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.


एरोफ्लोट एअरलाइन्सने आपली विमानसेवा मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलविण्याच्या केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, विरोधी पक्षनेत्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बंद पाडून खाजगी व्यावसायीकांना प्रोत्साहन देत असल्याबद्दल भाजप सरकारवर कठोर टीका केली.


मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब दक्षिण गोव्यातील सर्व निवडून आलेले आमदार आणि खासदार तसेच सर्व संबंधित प्राधिकरणे आणि भागधारकांची बैठक बोलावावी आणि नंतर दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू राहावे यासाठी एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे घेऊन जावे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.


जर सरकारने दाबोळी विमानतळ कार्यांवित राहण्यासाठी सक्रिय पावले उचलली नाहीत तर सदर  विमानतळ घोस्ट एअरपोर्ट होईल असा इशारा मी २०२२ मध्येच सरकारला दिला होता. दुर्दैवाने, भाजप सरकारने त्यानंतर काहीही केले नाही. एकामागून एक एअरलाइन्स आपल्या विमानसेवा मोपाला हलवित असताना सरकारने बघ्याची भूमिका घेतली, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

कतार  एअरवेजने मोपा येथे आपल्या विमानसेवा हलवण्याची घोषणा केल्यानंतर दाबोळी  विमानतळावरुन सर्व विमानसेवा हळुहळू मोपाला जातील असा इशारा मी दिला होता. माझा दावा आता खरा ठरत आहे असे युरी आलेमाव म्हणाले.


दक्षिण गोव्यात भाजपला राजकीय जनाधार नसल्यानेच दाबोळी विमानतळाच्या झालेल्या नुकसानीकडे भाजप सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. दक्षिण गोव्याचे लोक भाजपच्या धोरणांना पाठिंबा देत नसल्यामुळेच दक्षिण गोव्याचे नुकसान व्हावे अशी भाजपवाल्यांची इच्छा आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!