मडगाव :
दैवज्ञ ब्राम्हण समाज यांनी गोवा कॅरम संघटनेच्या सहकार्याने दुसरी दैवज्ञ कॅरम स्पर्धा 27 ऑगस्ट 2023 रोजी रविवारी या दिवशी दैवज्ञ भवन, कालकोंडा-मडगाव येथे आयोजित केली होती. दैवज्ञ ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष रामराव लोटलीकर, सचिव दिलीप लोटलीकर व क्रीडा अध्यक्ष विनीत शिरोडकर यांनी अतिथींचे स्वागत केले.
या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून मडगाव नगरपालिकेच्या उपाध्यक्ष दिपाली दिगंबर सावळ उपस्थित होत्या. त्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतूक केले. अशासारखे कार्यक्रमाद्वारे स्थानिक खेळांडूना त्यांचे कौशल्य आणि प्रतिभेस संधी देऊन युवा सशक्तीकरणास अतुल्य योगदान देत असल्याचे वक्तव्य केले. तसेच त्यांनी या कार्यक्रमाला आपल्यास भाग बनविल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
सदर स्पर्धा चार विभागात घेण्यात आली. मुले 17 वर्षापर्यंत, पुरुष 18-49 वर्षापर्यंत, महिला 18 वर्षे आणि त्याहून अधिक आणि ज्येष्ठ व्यक्ती 50 वर्षे व त्याहून अधिक अशा प्रकारे विभागण्यात आले. सदर कार्यक्रमास एकूण 120 प्रवेशिका आल्या होत्या.
पुरुष 18-49 वर्षे
विजेता-राहूल लोटलीकर
उपविजेता- श्रुती वेर्णेकर
उपांत्य विजेते- अलका चोणकर व दीपा अवणेकर
ज्येष्ठ व्यक्ती 50 वर्षे व त्याहून अधिक
विजेता-श्याम रायकर
उपविजेता- दीपक रायकर
उपांत्य विजेते- गिरेश बांदोडर व गुरूदत्त रायकर
मुले 17 वर्षापर्यंत
विजेता-रूत्विक नागझरकर
उपविजेता- सोहम चोडणकर
उपांत्य विजेते- राज वेर्लेकर आणि लक्ष चोडणकर
मुख्य अतिथी दिपाली दिगबंर सावळ यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. रामराव लोटलीकर, दिलीप लोटलीकर, विनित शिरोडकर आणि न्यानेश्वारी गुरूदत्त महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपा रायकर यांनी अन्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले.
वेदाक्ष रायकर आणि मयुरा बांदोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दैवज्ञ भवनाचे क्रीडा अध्यक्ष विनीत शिरोडकर यांनी आभार मानले.