
वेदांता वर दलाल स्ट्रीटचा ठाम विश्वास
आर्थिक वर्ष26 मधील वेदांता लिमिटेडच्या कामगिरीबद्दल प्रमुख जागतिक आणि भारतीय ब्रोकरेज आशावादी आहेत. मजबूत एलएमई किंमत ट्रेंड, खर्चाची शिस्त, डिलीव्हरेजिंग आणि ऍल्युमिनियम व्यवसायाची मजबुती यामुळे वेदांता ची कामगिरी उंचावणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वेदांताच्या कामगिरीवर भाष्य करताना या ब्रोकरेज संस्थांनी पुढील काही तिमाहीत सुरू होणाऱ्या किंवा पूर्ण होणाऱ्या वाढीच्या अनेक नियोजित प्रकल्पांची देखील नोंद घेतली आहे.
वेदांताचा पहिल्या तिमाहीतील एकत्रित इबीटडा अंदाजानुसारच होता. ऍल्युमिनियम, ऑइल अँड गॅस आणि पावर यासारख्या प्रमुख विभागांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. ज्यामुळे एकूणच इबीटडा मध्ये फरक पडल्याचे जे.पी. मॉर्गन यांनी नमूद केले आहे. चालू आणि पुढील आर्थिक वर्षातील उत्पन्नासाठी वेदांताच्या सध्या सुरू असलेल्या विविध उपक्रमांमुळे वाढीस मदत होईल अशी जे..पी. मॉर्गनला अपेक्षा आहे. “अॅल्युमिनियम व्यवसायातील वेदांताच्या क्षमतेतील वाढ आणि व्हर्टिकल इंटिग्रेशन) यामुळे खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे. LME किमती देखील सध्या अत्यंत कमी आहेत, मात्र FY26-27 मध्ये त्या वाढत राहतील असा अंदाज आहे. त्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे,” असे जे.पी. मॉर्गनने म्हटले आहे.
एलएमई किमती आणि त्याच्या संभाव्य फायद्यांबाबत सारखेच मत व्यक्त करताना, सिटी रिसर्चने म्हटले आहे की, वेदांताच्या पॅरेन्ट कंपनीची (वेदांता रिसोर्सेस) कर्ज पातळी सध्या योग्य पातळीवर आहे. मध्यम मुदतीच्या ऍल्युमिनियम एलएमईच्या किमती, कमी लागत आणि डीमर्जर यातील संभाव्य वाढ ही वेदांतासाठी फायदेशीर बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जागतिक स्तरावर ऍल्युमिनियमचा पुरवठा मर्यादित असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
गेल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत वेदांताचा इबीटडा वाढण्याची मुंबईस्थित नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजला अपेक्षा आहे. “वाढलेल्या किमती आणि ऍल्युमिनियमच्या कमी उत्पादन खर्चामुळे Q2FY26 मधील इबीटडा मध्ये गेल्या तिमाहीच्या तुलनेत 10% पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. प्रमुख ऍल्युमिनियम प्रकल्प Q2FY26 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. वेदांताचा निव्वळ कर्ज/इबीटडा (हिंदुस्तान झिंक चे कर्ज वगळून) मागील तिमाही आर्थिक वर्ष 26 च्या अखेरीस 1.7x पर्यंत कमी होईल, असा आमचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 25 मध्ये ते 2.7x होते. तर दुसरीकडे व्यवसायाचे डीमर्जर Q4FY26 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.”
यूके-स्थित इन्व्हेस्टेकने त्यांच्या पोस्ट-अर्निंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय रुपयाच्या घसरणीचा वेदांताला लाभ मिळेल. इन्व्हेस्टेकने सूचीबद्ध केलेल्या इतर सकारात्मक बाबींमध्ये नजीकच्या काळात होणारी ऍल्युमिनाच्या किमतीतील घट आणि कंपनीचे उत्पन्न याचाही उल्लेख करण्यात आला आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज आणि आयआयएफएल सारख्या रीसर्च कंपन्यांनी वेदांता लिमिटेडमधील खर्च कार्यक्षमता आणि आणि पॅरेन्ट कंपनी वेदांता रिसोर्सेसमधील डिलीव्हरेजिंग सारखे घटक फायदेशीर म्हणून नमूद केले आहे.
वेदांताचा अडजस्टेड पॅटमध्ये वार्षिक 13% नी वाढ होऊन तो ₹5,000 कोटींवर पोहोचला. कंपनीने पहिल्या तिमाहीत ₹10,746 कोटींचा सर्वाधिक इबीटडा नोंदवला, ज्यात वार्षिक 5% वाढ झाली.