google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडादेश/जग

फायनलपूर्वी Sonia Gandhi यांचा भारतीय संघाला खास मेसेज…

आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीसाठी आज (रविवार, 19 नोव्हेबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेत अजिंक्य आहे. एकही सामना न गमावता टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अशा स्थितीत तमाम देशवासीयांच्या नजरा विश्वचषक फायनलवर खिळल्या आहेत.

विजेतेपदाच्या लढतीपूर्वी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

रायबरेलीच्या लोकसभा खासदार, सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला ज्यामध्ये त्या म्हणाल्या, ‘प्रिय टीम इंडिया, या विश्वचषकादरम्यान तुमच्या अतुलनीय कामगिरीबद्दल आणि उत्कृष्ट टीमवर्कबद्दल मी तुमचे अभिनंदन करून सुरुवात करू इच्छिते. तुम्ही सातत्याने देशाला गौरव आणि आम्हाला एकत्रितपणे आनंद साजरे करण्याचे क्षण मिळवून दिले आहेत.”

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंतच्या तुमच्या प्रवासात मोठे संदेश आहेत. ते संदेश एकता, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे आहेत. यासाठी मी टीम इंडियाच्या खेळाडू आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करू इच्छितो.

“आज मला भारताने विश्वचषक ट्रॉफी जिंकतानाचे शेवटचे दोन प्रसंग आठवत आहेत. प्रथम 1983 आणि नंतर 2011 मध्ये. त्या दोन्ही प्रसंगी, देशाने आनंद साजरा केला. आता तो प्रसंग पुन्हा आला आहे,” असेही गांधी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

“लिंग, प्रदेश, भाषा, धर्म आणि वर्ग यांचा विचार न करता क्रिकेटने नेहमीच आपल्या देशाला एकत्र केले आहे आणि आता तुम्ही या वर्षीच्या फायनलसाठी तयारी करत असताना, संपूर्ण देश तुमच्या पाठिशी आहे. मी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देते. जगज्जेता होण्यासाठी जगज्जेत्यामध्ये जे गुण असले पाहिजेत ते सर्व गुण तुमच्यात आहेत,” या खास अंदाजात कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टीम इंडियाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्या दिल्या.

 

 

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!