google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

काँग्रेस म्हणतेय, ‘…हि तर बदलाची सुरुवात’

मडगाव :

शहराच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षदासाठी मतदान आज सकाळी सुरू झाले. सदानंद नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर घनश्याम शिरोडकर आणि दामोदर शिरोडकर यांच्यात सरळ लढत झाली. दामोदर शिरोडाकर यांना दहा मते मिळाली असून, घनश्याम शिरोडकर 15 मतांनी विजयी झाले आहेत.

दामोदर शिरोडकर यांच्या पराभवामुळे नुकतेच भाजपमध्ये सामिल झालेल्या माजी मुख्यमंत्री दिगबंर कामत यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, या निवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी सांगितले कि, ‘ मडगाव ही सासष्टीची राजधानी आहे. बदलाला सुरुवात झाली आहे. मडगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांचे हार्दिक अभिनंदन. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी मतदान करणाऱ्या १५ नगरसेवकांचे अभिनंदन.’

तसेच ‘ऐतिहासिक मडगाव शहरात गोवा क्रांती आंदोलन सुरू झाले. गोव्यातील लोकांच्या भावना जपत आज परत एकदा मडगावकरांनी क्रांतिकारी पाऊल उचलले. जनादेश लोकशाही पायदळी तुडविणाऱ्या भाजप विरूद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मी सर्व १५ नगरसेवकांचे अभिनंदन करतो ज्यांनी भाजप समर्थित उमेदवाराच्या विरोधात मतदान केले आणि लोकशाही प्रती त्यांची बांधिलकी दर्शविली. देव गोव्याचे भले करो, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!