पिंपोडे बुद्रुक येथे राहत्या घराला व दुकानाला भीषण आग
सातारा (महेश पवार):
पिंपोडे बुद्रुक येथील बस स्थानक परिसरात असणाऱ्या दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या राहत्या घराला व त्यांनी दिलेल्या भाडेतत्त्वावरती असणाऱ्या दुकान मे. ॲग्रो हायटेक या अनिल ढोले यांच्या शेतीविषयक दुकानाला आज पहाटेच्या दरम्यान शॉट सर्किट मुळे भीषण अशी आग लागली.
यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर 50 ते 60 लाख रुपयांच्या दरम्यान या आगीमध्ये आर्थिक नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर परिसरात दूरवर आगीचे लोट व धूर पसरलेला दिसून आला पिंपोडे बुद्रुक येथील नागरिकांनी आग विझवणामध्ये अथक परिश्रम घेतले. तसेच वाई अग्निशामक दलाच्यावतीनेही आग विझवण्यात आली. या लागलेल्या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणावर पिंपोडे बुद्रुक येथील वातावरण भयभीत झाल्याचे दिसून आले.