…आता फ्लिपकार्टही देणार वैयक्तिक कर्ज
बंगळुरू:
भारतातील स्वदेशी ई-कॉमर्स मार्केटप्लेस फ्लिपकार्टने खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेसोबत आपल्या मौल्यवान ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्जे सुलभ करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्यामुळे त्यांच्या ४५० दशलक्ष ग्राहकांना अतिरिक्त सुविधा आणि वाढीव फायदे मिळतील.
नव्याने सादर करण्यात आलेली वैयक्तिक कर्ज सेवा अत्यंत कार्यक्षम कर्ज पर्याय सादर करते, ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेपर्यंत मंजुरी देते. त्यामुळे ग्राहकांना ६ ते ३६ महिन्यांपासून लवचिक परतफेड चक्र मिळते. फ्लिपकार्टची वैयक्तिक कर्जाची सुविधा आजच्या आर्थिक वातावरणात ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि डिजिटल कर्ज देण्याच्या संभाव्यतेचा लाभ घेण्याबाबतची आपली बांधिलकी दर्शवते.
भारतीय ग्राहक जसजसे पुढे जात आहेत तसतशी त्यांची जीवनशैली उंचावण्याची इच्छा वाढत आहे. फ्लिपकार्ट आणि अॅक्सिस बँकेने ग्राहकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी सातत्याने डिजिटल-फर्स्ट उपाय सुविधा शोधल्या आहेत. वैयक्तिक कर्ज सुविधा ग्राहकांना वाढीव क्रयशक्तीसह सक्षम करेल. तसेच सुलभता आणि परवडणारी क्षमता यांच्यात सुधारणा करेल. फ्लिपकार्टने पे लेटर, प्रॉडक्ट फायनान्सिंग, सेलर फायनान्सिंग, क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जामध्ये विस्तार यासह क्रेडिट ऑफरिंगचा विस्तृत पट आणि सर्वसमावेशक आर्थिक उपाय तयार करण्यासाठी भरीव बांधिलकी दर्शवली आहे.
फ्लिपकार्टच्या फिनटेक आणि पेमेंट्स ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज अनेजा म्हणाले, “अग्रगण्य बँकिंग संस्थांसोबत धोरणात्मक सहकार्याद्वारे, आम्ही आमच्या ग्राहकांना परवडणाऱ्या पेमेंट पर्यायांच्या विस्तृत श्रेणीसह यशस्वीरित्या सक्षम केले आहे. या पर्यायांमध्ये बाय नाऊ पे लेटर (BNPL), इक्वेटेड मासिक हप्ते (EMI) आणि को-ब्रँडेड क्रेडिट कार्डस यांचा समावेश आहे. अॅक्सिस बँकेच्या भागीदारीत आता वैयक्तिक कर्ज सेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे लक्ष्य क्रेडिट सक्षम करणे आणि आवश्यकतेनुसार तरलतेपर्यंत अचूकपणे प्रवेश देऊन क्रयशक्ती वाढवणे आहे. या आर्थिक सुविधा ग्राहकांच्या विकसनशील मागण्या पूर्ण करतात, त्यांच्या खरेदी प्रवासादरम्यान अधिक लवचिकता आणि सुविधा देतात. आमची बांधिलकी ऑनलाइन शॉपिंग लँडस्केपला आकार देणे, सर्वांसाठी सुलभता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करणे यात आहे.”
या सादरीकरणाप्रसंगी बोलताना अॅक्सिस बँकेच्या डिजिटल बिझनेस अँड ट्रान्सफॉर्मेशनचे अध्यक्ष आणि प्रमुख समीर शेट्टी म्हणाले, “अॅक्सिस बँक ही संपूर्ण आर्थिक सुविधा पुरवठादार आहे आणि आम्ही सातत्याने नावीन्यपूर्णतेवर आधारित भागीदारी मॉडेल्स उभारत आहोत. ग्राहकांना सर्वात जास्त फायदा होईल अशा ऑफरसह भारतात अधिकृत क्रेडिट मिळवण्याच्या बांधिलकीसह कार्यरत आहोत. या प्रयत्नात वापरकर्त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणार्या ग्राहकानुरूप उपाय सुविधा सादर करत विस्तृत प्रमाणातील ग्राहकांसाठी अतुलनीय कर्ज सुविधा पुरविण्याकरता फ्लिपकार्टसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. एकत्रितपणे आम्ही ग्राहकांसाठी सुविधा आणि सुलभतेचे एक नवीन युग आणण्यासाठी सज्ज आहोत.”
ग्राहक त्यांच्या कर्जाची मंजुरी प्रक्रिया केवळ ३० सेकंदात पूर्ण होण्याची अपेक्षा करू शकतात. त्यांच्या कर्ज अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, त्यांनी मूलभूत तपशील जसे की पॅन (पर्मनंट अकाऊंट क्रमांक), जन्मतारीख आणि कामाचे तपशील पुरविणे आवश्यक आहे. एकदा हे तपशील पुरविल्यानंतर, अॅक्सिस बँक त्यांची कर्ज मर्यादा मंजूर करेल. त्यानंतर ग्राहक त्यांच्या सोयीस्कर मासिक परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या पसंतीची कर्जाची रक्कम आणि परतफेडीची पद्धत निवडू शकतात. फ्लिपकार्ट कर्जाचा अर्ज अंतिम करण्यापूर्वी पुनरावलोकनासाठी सर्वसमावेशक कर्ज सारांश माहिती, परतफेडीचे तपशील आणि अटी व शर्ती सादर करेल.