google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘या’ स्कुटरने पार केला तीन कोटींचा टप्पा…

पणजी:

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज भारतातील पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री करणाऱ्या अ‍ॅक्टिव्हा या स्कूटर ब्रँडने ३ कोटी ग्राहकांचा टप्पा पार करत भारतीय दुचाकी उद्योगात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या लक्षणीय कामगिरीवरून एचएमएसआयचे भारतीय दुचाकी क्षेत्रातील बळकट स्थान तसेच देशात अत्याधुनिक, विश्वासार्ह, दर्जेदारी दुचाकी वाहने पुरवण्याची बांधिलकी दिसून येते.

२००१ मध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हा सादर करत कंपनीने भारतीय दुचाकी बाजारपेठेची सगळी समीकरणे बदलली. दैनंदिन प्रवास सोपा करत कंपनीने लाखो ग्राहकांचे आयुष्य उंचावले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार कामगिरी आणि विश्वासार्हता यांमुळे अ‍ॅक्टिव्हाला कायमच भारतीय ग्राहकांची पहिली पसंती मिळाली. आपल्या २२ वर्षांच्या प्रवासात अ‍ॅक्टिव्हाने विविध टप्पे पार करत दैदिप्यमान यश मिळवले.

३ कोटी भारतीय कुटुंबांच्या स्वप्नांना पंख देण्याचा अ‍ॅक्टिव्हाचा प्रवास प्रत्येक वर्षागणिक भारताचे अ‍ॅक्टिव्हावर असलेले प्रेम वाढतच गेले. २००१ मधे पर्दापण केल्यापासून केवळ तीन वर्षांत (२००३-२००४) अ‍ॅक्टिव्हाने स्कूटर क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवले. त्यानंतरच्या केवळ दोनच वर्षांत या ब्रँडने १० लाख ग्राहकांचा टप्पाही पार केला.


उच्च तंत्रज्ञान आणि भविष्यवेधी विचारसरणीच्या मदतीने अ‍ॅक्टिव्हाने केवळ १५ वर्षांत (२०१५) 1 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला. मागणी वाढली तशी भारतातील स्कूटर बाजारपेठेला आणखी चालना मिळाली व हा ब्रँड भारतीय कुटुंबांच्या सर्वाधिक पसंतीचा ब्रँड ठरला. या ब्रँडची लोकप्रियता इतकी आहे, की २ कोटी ग्राहक दुप्पट वेगाने म्हणजेच केवळ सात वर्षांत (२०२३) जोडले गेले.


या ऐतिहासिक कामगिरीविषयी कृतज्ञता व्यक्त करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘आम्हाला होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या या लक्षणीय प्रवासाचा अभिमान वाटतो. केवळ २२ वर्षांत ३ कोटी ग्राहकांचा टप्पा गाठणं हे ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दर्शवणारं आहे. ग्राहकांना अशीच दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’


होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक योगेश माथुर म्हणाले, ‘हा विक्रमी टप्पा स्कूटर क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी आम्ही बांधील असल्याचे प्रतीक आहे. ब्रँड अ‍ॅक्टिव्हा आणि एचएमएसआयवर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही ३ कोटी भारतीय कुटुंबांचे आभारी आहोत. स्थापनेपासून आतापर्यंत ग्राहकांच्या गरजेनुसार अ‍ॅक्टिव्हामध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या. बदलत्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. ग्राहकांना क्रांतीकारी तंत्रज्ञान व असामान्य अनुभव देण्यावर यापुढेही आमचा भर असेल.’

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!