
महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एकाला अटक
एका महिलेचा पाठलाग करुन विचित्र हातवारे करीत त्रास दिल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दिली होती. संशयित पोलिस कोठडीत असून फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने 12 ऑगस्टला फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असे नमुद करण्यात आले की, संशयित आरोपीने शुक्रवारी शिरोडा येथे तक्रारदार महिलेचा पाठलाग करीत लैंगिक छळ केला. तसेच फिर्यादीला हातवारे केले.
त्यानंतर फिर्यादी व तिचा पती संशयित आरोपीला भेटायला गेले असता आरोपीने फिर्यादी व तिच्या पतीला पोलिसांना माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेत अटक केली. पांडुरंग गावकर (42) रा. शिरोडा या संशयिताला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दक्षिण गोव्याचे एसपी अभिषेक धानिया, फोंडा पीआय तुषार लोटलीकर, एसडीपीओ फोंडा आशिष शिरोडकर यांच्या देखरेखीखाली एलपीएसआय रश्मी बैडकर पुढील तपास करीत आहेत.