google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘ओबीसीं, अनुसूचित जातीं व जमातीना गोमेकाॕत आरक्षण न मिळाल्यास आंदोलन’

पणजी :

गोवा वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयात एकूण ६० जागा आहेत. त्यातील ओबीसी वर्गासाठी १६ जागा, अनुसूचित जमातींसाठी ७ तर अनुसूचित जातींसाठी १ जागा राखीव आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मागास वर्गासाठी आणी अनुसूचित जातीं व जमातींसाठीइच्छुक विद्यार्थ्यांना या हक्कांपासून भाजप सरकारने वंचित ठेवले आहे. हे सरकार बहुजन विरोधी असल्याची टीका माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.


वैद्यकीय महाविद्यालयात विविध शाखांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात न्यायालयाचा आदेश असून देखील सरकार त्याची अंमलबजावणी करण्यात चालढकल करताना दिसत आहे, असे सांगून ते म्हणाले, सदर आरक्षणाची फाईल कायदा विभागात प्रलंबित ठेवली आहे. ही फाईल तातडीने मंजूर करून नियम दुरुस्ती करून मंत्रिमंडळात मान्य करून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण पहिल्या फेरीत इच्छुक ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला नाही. निदान दुसऱ्या फेरीत तरी ही मुले न्यायापासून वंचित राहता कामा नये असे, चोडणकर म्हणाले.


गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे बहुजन विरोधी आणि बहुजनद्वेष्टे आहेत, हे खरे असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे असे, चोडणकर म्हणाले. कारण राजकीय खेळी खेळून तसेच काॅंग्रेसमधील आमदारांना फोडून भाजपमधीलच बहुजन समाजातील अनेक नेत्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असे भाजपमधीलच काही लोक सांगत आहेत, असे चोडणकर म्हणाले. कोणत्याही खात्यातील नोकऱ्या असल्या तरी शेवटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांपाशीच जात असल्याने तिथेही ठारविक ओबीसींना कसे वगळता येईल याचाच ते प्रयत्न करतात असे खुद्द त्यांच्याच पक्षाचे लोक बोलत आहेत, असे चोडणकर म्हणाले.


आज वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने अनेक बहुजन समजाची मुले गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आरक्षणाकडे डोळे लावून बसली आहेत. पण न्यायालयाने आदेश देऊनही त्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे ती केवळ मागासवर्गातील मुले शिकून मोठी होऊ नयेत यासाठीच का? असा प्रश्न चोडणकर यांनी उपस्थित केला आहे.


मुख्यमंत्री डॉ. सावंत हे पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असल्याचे जाणवते. कारण मोदी सरकार आरक्षण विरोधी असून सध्या गुजरातमध्ये आरक्षण संपल्यातच जमा आहे. सरकारी कंपन्या आपल्या दोन क्रोनी कॅपिटलीस्ट मित्रांना विकून त्या कंपन्यांचे खाजगीकरण करून आरक्षण संपवण्याचा त्यांचा घाट आहे हे उघड आहे. गोव्यात सावंत सरकार वेगळ्या पद्धतीने आरक्षण संपवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ भाजपला ओबीसी आणि इतर कमजोर समाजातील लोकांना निवडणुकीपुरतेच मतांसाठी वापरून घ्यायचे आहे हे दिसून येते. त्यामुळे भाजपाचा अजेंडा हा सर्वसामान्य जनतेला गुलाम करून त्यांच्यावर हवे तसे राज्य करण्याचा आहे हे आता लपून राहिलेले नाही असा घणाघाती आरोप चोडणकर यांनी केला. त्याच बरोबर इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजाला भाजपाची ही चाल का समजत नाही, याबद्दल चोडणकर यांनी चिंता व्यक्त केली.



गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक समाजसेवी संस्थांनी आवाज उठवला आहे. मात्र डॉ. सावंत सरकारच्या तोंडावरील माशीही उडालेली नाही. सध्या या सरकारच्या मंत्रिमंडळात ते ही दुय्यम खाती सांभाळणारे केवळ चार ज्येष्ठ बहुजन नेते आहेत. त्यापैकी ज्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी बरेच परिश्रम घेऊन कार्य केले आहे असे, विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक तसेच, सुभाष शिरोडकर व निळकंठ हळर्णकर, गोविंद गावडे असे हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच लोकं मंत्रिमंडळात आहेत. त्यांनी या विषयात लक्ष घालून सरकारकडून या आरक्षणाची अंमलबजावणी करून घेणे आवश्यक व अपेक्षित होते. पण आज पर्यंत त्यांच्याकडून तसे प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. सरकारवर दबाव आणला किंवा सरकार विरोधात आवाज केला तर आपले मंत्रिमंडळ जाईल या भीतीने हे नेते गप्प बसलेले आहें. हया नेत्यानी बहुजन समजाचा वापर आपली राजकीय पोळ भज़ण्यस केली आहे अशी टीका गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

सध्या वैद्यकीय प्रवेशांची पहिली फेरी झालेली असून निदान दुसऱ्या फेरीत तरी ओबीसी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी करून त्या मुलांना न्याय द्यावा. अन्यथा संपूर्ण राज्यभर जागृती करुन एक मोठे आंदोलन उभे करू, असा इशारा चोडणकर यांनी दिला आहे. बहुजन समजाचे खूप प्रश्न आद्याप पडुन रेंग़लत राहिले आहें याची आठवण चोडणकर यांनी करुन दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!