
Goa Board SSC Result 2025:गोवा बोर्डाचा 10 वीचा निकाल जाहीर
गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेच्या निकाल सोमवारी (07 एप्रिल) सायंकाळी पाच वाजता जाहीर झाला. यंदाही पुन्हा एकदा दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. राज्याचा 95.35 टक्के एवढा निकाल लागला, ज्यामध्ये 95.71 टक्के मुली तर 94.98 टक्के मुले उत्तीर्ण झाली. निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.
दरम्यान, गोवा शालान्त मंडळाकडून यावर्षी 1 ते 21 मार्च 2025 या काळात दहावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. 32 केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेला (Exam) 18,832 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 9280 मुले आणि 9,558 मुलींचा समावेश होता.
गेल्या वर्षी गोव्यात (Goa) 18,914 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी 17,473 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी दहावीचा निकाल 92.38 टक्के एवढा लागला होता. दरम्यान, निकालपत्र वितरणाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.