गोवासिनेनामा 

के. वैकुंठ जन्मशताब्दीचे मडगावात आयोजन

मडगाव : मडगांवचो आवाज तर्फे मडगावचे सुपुत्र व नामांकित सिनेमाटोग्राफर के. वैकुंठ यांची जन्मशताब्दी सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४.३० वा. इम्पेरियल हॉल, एम.सी.सी. क्लब, राजेंद्र प्रसाद स्टेडीयम, मडगाव येथे साजरी करण्यात येणार आहे. गोव्याला अभिमान व सन्मान मिळवून देणाऱ्या एका सर्जनशील व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे युवा नेते प्रभव नायक यांनी सांगितले.


के. वैकुंठ यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप कुंकळयेकर परिवार तसेच गोव्याच्या चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून. के. वैकुंठ यांच्या कुटुंबीयांच्या तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने सदर कार्यक्रमाची शोभा वाढणार असल्याचे प्रभव नायक म्हणाले.


के. वैकुंठ यांनी आपल्या अद्वितीय प्रतिभेने  मडगावचे नाव देशभर पोहोचवले आणि भारतीय चित्रपटसृष्टीवरआपला खास ठसा उमटवला. “त्यांच्या कलात्मक दृष्टीकोनातून भारतीय सिनेसृष्टीवर त्यांनी कोरलेला ठसा आजही चित्रपट निर्मात्यांना आणि रसिकांना प्रेरणा देतो,” असे प्रभव नायक यांनी सांगितले.


के. वैकुंठ यांचे जीवन व प्रवास हा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांची कारकीर्द तरुणांना मर्यादा ओलांडून मोठी स्वप्ने पाहण्याची, अडथळे पार करण्याची आणि कला, संस्कृती व सर्जनशीलतेच्या सामर्थ्याने आपली ओळख घडविण्याची प्रेरणा देते, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.


मडगावचे सुपुत्र के. वैकुंठ यांच्या स्मृतीस अभिवादन करणे हा मोठा अभिमान व सन्मानाचा क्षण आहे. त्यांचे कार्य केवळ कलात्मक कामगिरी नाही तर गोव्याच्या सांस्कृतिक वारशातील एक अमूल्य ठेवा आहे, जो कायम स्मरणात ठेवून भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे प्रभव नायक म्हणाले.


परिश्रम, जिद्द व प्रामाणिकपणाच्या जोरावर गोमंतकीय राष्ट्रीय स्तरावरही नाव कमवू  शकतात हे के. वैकुंठ यांनी दाखवून दिले आहे. जन्मशताब्दी सांगता कार्यक्रमास उपस्थित राहून आपण सर्वांनी के. वैकुंठ यांच्या महान कार्याचा गौरव करावा, अशी विनंती प्रभव नायक यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!