‘खलाशांना द्यावी कायमस्वरूपी पेंशन’
मडगाव :
गोवा व्हिजन २०३५ रोडमॅपमध्ये खलाशांना कायमस्वरूपी पेन्शन योजना लागू करण्याचे काँग्रेस पक्षाने वचन दिले होते. गोव्याच्या विकासासाठी खलाशांच्या योगदानाचा आदर करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की त्यांनी खलाशांसाठी कायमस्वरूपी पेंशन योजना अधिसूचित करावी आणि लाभधारकांना देय असलेली थकबाकी त्वरित द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
नाताळच्या काळात बहुतेक खलाशी गोव्यात परत येतात. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की त्यांनी कायमस्वरूपी पेन्शन योजना अधिसूचित करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणावे आणि मागील दोन महिन्यांची प्रलंबित थकबाकीची रक्कम लाभधारक खलाशी व त्यांच्या विधवांच्या खात्यात जमा करावी असे युरी आलेमाव म्हणाले.
खलाशी पेंशन योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी सरकारने अर्जांची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे. बहुतेक खलाशी आणि त्यांच्या विधवा यांना तंत्रज्ञानाची जाण नसल्याने नाहीत अर्जासोबत लागणारी विविध कागदपत्रे सादर करण्यात त्यांना अडचणी येतात. अर्ज सादर करणे, कागदपत्रे जोडणे इत्यादी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एनआरआय विभागाने गोव्यातील किनारी भागात शिबिरे आयोजित केली पाहिजेत ज्यामुळे लाभार्थ्यांना मोठी मदत होईल, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
गोवा सीमेन असोसिएशन ऑफ इंडियाला मान्यता द्यावी आणि त्यांना सरकारकडून सहाय्य तसेच पायाभूत सुवीधा उपलब्द करून द्यावीत, असे मी सरकारला आवाहन करतो, असे युरी आलेमाव म्हणाले.
खलाशी त्यांच्या मातृभूमीपासून मैल दूर राहतात, परकीय चलन मिळवतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देतात. गोव्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन युरी आलेमाव यांनी केले.