google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

‘राणा फाना हवेच्या फुटान्यासारखे फोडून टाकतो’

अमरावती (अभयकुमार देशमुख) :

सध्या अमरावतीत आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या जोरदार वाद सुरू आहे. आज रात्री मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत रवी राणा आणि बच्चू कडू यांची बैठक आहे. मात्र या बैठकीपूर्वी अमरावतीच्या तिवसा येथे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या वतीने बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली.

या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आमदार रवी राणावर जोरदार टीका केली.राणा फाना हवेच्या फुटान्यासारखे फोडून टाकले साले असा टीका त्यांनी केला. सात – आठ पक्ष जरी एकत्र आले तरी आमचा पराभव होऊ शकत नाही. असंही बच्चू कडू यांनी सांगितले. एकंदरीतच बच्चू कडू यांनी आज मुंबई जाण्यापूर्वीच रवी राणाला थेट फुटान्यासारखं फोडण्याची धमकी दिल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!