google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडा

शेवटच्या चेंडूवर जिंकला ‘गुजरात’ने हरलेला सामना

मुंबई:

क्रिकेट रसिकांना आज आयपीएलमधला सर्वात रोमांचक सामना पहायला मिळाला. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आज हरलेला सामना जिंकला. या विजयाचा नायक ठरला राशिद खान. (Rashid Khan) सनरायजर्स हैदराबादने गुजरातला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 23 धावांची गरज होती. राहुल तेवतिया आणि राशिद खानची जोडी मैदानात होती. मार्को जॅनसेन गोलंदाजी करत होता. राशिद खानने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून गुजरातला एक थरारक विजय मिळवून दिला. राशिद खानने 11 चेंडूत नाबाद 31 धावा फटकावल्या. यात चार सिक्स होते. राहुल तेवतिया (Rahul Tewtia) 21 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला. त्याने चार चौकार आणि दोन सिक्स मारले. गुजरातने सनरायजर्स हैदराबादवर पाच विकेटने विजय मिळवला. क्रिकेट रसिकांना आज एक थरारक सामना पहायला मिळाला. गुजरातने सनरायजर्स हैदराबादवर पाच विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह गुजरातने मागच्या सामन्यात झालेल्या पराभवाचा हिशोब चुकता केला.

या विजयानंतर आयपीएल पॉइंटस टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या नंबरवर ढकललं. गुजरातने आठ पैकी सात सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सला शेवटच्या दोन षटकात विजयासाठी 35 धावांची आवश्यकता होती. राहुल तेवतिया आणि राशिद खान क्रीझवर होते. हैदराबादकडून टी.नटराजन 19 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमध्ये एकूण 13 धावा निघाल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 22 रन्स हवे होते.

मोक्याच्याक्षणी राहुल आणि राशिदने आपली बॅट चालवली. दोघांनी या ओव्हरमध्ये चार सिक्स मारुन गुजरातला स्पर्धेतील सर्वात रोमांचक विजय मिळवून दिला. गुजरातला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती. राशिद खान स्ट्राइकवर होता. त्याने थेट सिक्स मारुन मॅचच संपवली.

दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅनसेन हैदराबादाचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या चार ओव्हर्समध्ये 63 धावा लुटल्या. राशिद खानने आज फार चांगली गोलंदाजी केली नव्हती. त्याने चार षटकात 45 धावा देत एकही विकेट काढली नव्हती. पण ही कमतरता त्याने आज भरुन काढली. आपल्या जुन्या संघाला जोरदार तडाखा दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!