google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R साठी रायडर्स तयार…

काही महिन्यांचे सातत्यपूर्ण रेसिंग आणि अटीतटीच्या लढतीनंतर इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R चा २०२४ सीझनची या वीकेंडला चेन्नईतील मद्रास इंटरनॅशनल सर्किट (पूर्वीचे मद्रास मोटर रेस ट्रॅक) येथे सांगता होणार आहे.


चौथ्या फेरीतील थरारक रेसनंतर आगामी पाचव्या फेरीमध्येही तुल्यबळ स्पर्धा पाहायला मिळणार असून होंडा रेसिंग इंडियाचे उदयोन्मुख तरुण रेसर्स शेवटच्या शोडाउनसाठी सज्ज होत आहेत.
चौथ्या फेरीत वर्चस्व गाजवणाऱ्या मोहसिन परांबेन यांनी फ्रंट रनर म्हणून स्वतःचे स्थान प्रस्थापित करत अचूकता आणि वेगासह पहिले स्थान मिळवले आहे. आपले कौशल्य धोरणात्मक पद्धतीने मांडणाऱ्या मोहसिन यांच्यानंतर प्रकाश कामत आणि सिद्धेश सावंत यांनी स्थान मिळवले. या दोघांनी पोडियम फिनिश करत अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान स्थान मिळवले.


अंतिम फेरीसाठी मंच सज्ज असून या वीकेंडला विजयाच्या दिशेने घोडदौड करण्यासाठी सर्व रेसर्स सज्ज आहेत. इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R मध्ये १२ तरुणांचे ग्रिड पाहायला मिळेल. हे रायडर्स मोटो थ्री रेस मशिन प्लॅटफॉर्म – NSF250R वर राइड करणार असून त्यात होंडा रेसिंग इंडियाच्या दोन स्त्री रायडर्स – जगथीश्री कुमारेसन आणि रक्षिता एस दवे यांचा समावेश असेल.


इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप्ससाठी रायडर्सची नवीन पिढी घडवण्यासाठी खास तयार करण्यात आलेला प्रतिष्ठित प्लॅटफॉर्म आहे. रेसिंग विश्वात उंचावर जाऊ इच्छिणाऱ्या तरुण रायडर्ससाठी पहिली पायरी मानला जातो. चॅम्पियनशीपमध्ये होंडा NSF250R मोटरसायकल्सचा समावेश करण्यात आला असून त्या मोटोथ्री रेसिंगसाठी खास तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे स्पर्धात्मक प्लॅटफॉर्म मिळणे शक्य होईल. हलक्या वजनाची चासिस, दमदार इंजिन आणि एयरोडायनॅमिक बॉडीवर्क यांसह NSF250R ट्रॅकवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करते. गुणवत्तापूर्ण रायडर्सना ओळखून त्यांचा विकास करणे व त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे या चॅम्पियनशीपचे प्रमुख उद्दिष्ट आहे. काळजीपूर्वक आखलेला मार्ग उपलब्ध करून इदेमित्सु होंडा इंडियन टॅलेंट कप NSF250R भारतीय रायडर्सना व्यावसायिक मोटरसायकल रेसिंगच्या विश्वात उंचावर घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे.


२०२४ सीझनमध्ये पाच फेऱ्यांचा समावेश असून त्याची सुरुवात मद्रास इंटरनॅशनल सर्किट (चेन्नई) येथे १४-१६ जून २०२४ दरम्यान झाली. अंतिम आणि पाचवी फेरी याच ठिकाणी ५-६ ऑक्टोबरला होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!