google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘हॉस्पिसिओ : टर्शरी ते सेमी टर्शरी, नऊ महिन्यांत काय बदललं?’

मडगाव :
२७ ऑगस्ट २०२४ रोजी मडगावच्या नागरिकांनी हॉस्पिसियो दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाल गोवा हे पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्यासाठी आणि प्रगत आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. ३१ ऑगस्ट रोजी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी हे रुग्णालय टर्शरी बनवणे ही आपली जबाबदारी असल्याचं जाहीरपणे सांगितलं. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांनी इस्पितळाला भेट दिली आणि जनतेत आशा निर्माण केली. पण आता, केवळ नऊ महिन्यांनी, तेच मंत्री म्हणतात ” सेमी टर्शरी दर्जा देण्यासाठी मार्ग शोधू. नक्की काय बदललं? आणि दक्षिण गोव्याशी असा दुजाभाव का? असा संतप्त सवाल मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी विचारला आहे.

हॉस्पिसियोमध्ये अजूनही प्रचंड मनुष्यबळाची कमतरता आहे. अनेक महत्त्वाची पदं रिक्त आहेत. परिचारिका, तंत्रज्ञ, तज्ज्ञ डॉक्टर यांची भरती अजूनही रखडली आहे. सरकारच्या वारंवार आश्वासनानंतरही भरती प्रक्रियेत गती नाही. एक जिल्हा रुग्णालय इतक्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर चालवणं हे आरोग्य व्यवस्थेवर अन्यायच आहे, असं प्रभव नायक म्हणाले.

२०२५ सालात असूनही हॉस्पिसियोत कार्डियाक कॅथ लॅब उपलब्ध नाही, जी टर्शरी नव्हे नव्हे, तर अर्ध-टर्शरी रुग्णालयासाठीही अत्यावश्यक आहे. त्यामुळे हृदयरुग्णांना अजूनही बांबोळीला गोमेकोत किंवा खासगी रुग्णालयात पाठवलं जातं, आणि वेळेअभावी त्यांचे प्राणही धोक्यात येतात. त्याचप्रमाणे, न्यूरोसर्जरी युनिटचाही अभाव आहे. अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार न मिळाल्यामुळे त्यांना दूर गोमेकोमध्ये हलवावं लागतं. हे जीवाशी खेळणं आहे, असं प्रभव नायक यांनी सांगितलं.

ऍम्ब्युलन्स सुविधाही अत्यंत अपुरी आहे. आवश्यकतेनुसार ॲडवान्स आणि  बीएलएस ऍम्ब्युलन्स चोवीस तास उपलब्ध नाहीत. ज्या आहेत ते अपुरे सुविधांच्या  आहेत, आणि त्यांमध्ये प्रशिक्षित कर्मचारीही नियमितपणे नसतात. त्यामुळे अनेकदा रुग्णांना खासगी वाहनाने जावं लागतं जे एका जिल्हा रुग्णालयाच्या हेतूलाच हरताळ फासणारं आहे, असा आरोप नायक यांनी केला.

दक्षिण गोव्याच्या जनतेला दर्जेदार व परवडणारी सार्वजनिक आरोग्य सुविधा देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने जबाबदारीने आम्हाला उत्तर द्यावे आणि तात्काळ कृती करावी. फक्त गोंडस आश्वासनं आता चालणान नाहीत. आरोग्यमंत्र्यांनी जसं आश्वासन दिलं होतं, तसं पूर्ण क्षमतेने कार्यरत टर्शरी रुग्णालय दर्जा हॉस्पिसियोला मिळायलाच हवा.  दक्षिण गोव्याला दुय्यम वागणूक देणं आम्ही सहन करणार नाही, असा इशारा प्रभव नायक यांनी दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!