
आयएचसीएलने केली ‘ताज बँडस्टॅन्ड मुंबई’ची घोषणा
मुंबई : भारतातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने (आयएचसीएल) ताज बँडस्टॅन्ड प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ताज बँडस्टॅन्ड मुंबईच्या स्कायलाईनची नवी व्याख्या रचण्यासाठी सज्ज केला जात असलेला नवीन लॅन्डमार्क आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन पार पडले.
पुनीत छटवाल, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आयएचसीएल यांनी सांगितले,”आयएचसीएलने आपले पहिले हॉटेल – द ताज महल पॅलेस बॉम्बेमध्ये १९०३ साली सुरु केले आणि तेव्हापासून आजतागायत, एक शतकभराहून अधिक काळापासून ताज ब्रँड या शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. ताजच्या महान वारशाचे एक प्रमुख उदाहरण ताज बँडस्टॅन्ड पुढील शतकभर प्रतिष्ठित ब्रँड ताजचे नेतृत्व करत राहील. ही शानदार इमारत मुंबईच्या स्कायलाईनची नवी व्याख्या रचेल, हा ऐतिहासिक विकास मुंबईच्या भावनेचा, येथील लोकांचा आणि या शहराच्या वाढत्या वैश्विक प्रभावाचा मानबिंदू असणार आहे.”
त्यांनी पुढे सांगितले,”आम्हाला आयओडी आणि प्रोव्हिजनल फायर एनओसीसहित प्रमुख बांधकामपूर्व परवानगी मिळालेली आहे. आयएचसीएलला आशा आहे की, सर्व मंजुऱ्या मिळाल्यावर २०२५ मध्ये बांधकाम सुरु होईल आणि पुढील चार वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण केला जाईल.”
२ एकर ऐसपैस जागेमध्ये पसरलेल्या ताज बँडस्टँडमध्ये ३३० खोल्या आणि ८५ अपार्टमेंट्स असतील. जेवणाचे अनेक पर्याय, कन्वेन्शन स्पेस आणि जागतिक दर्जाच्या सुविधांनी हे सुसज्ज असेल. या प्रकल्पामध्ये शहराच्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब असलेले लँडस्केप गार्डन, क्रीडा आणि मनोरंजनाच्या सुविधा तसेच आसपासच्या परिसराचा विकास आणि देखभाल देखील यांचा देखील समावेश असेल. हे हॉटेल धरून आयएचसीएलची मुंबईत १७ हॉटेल्स आहेत, त्यापैकी ५ हॉटेल्सचे बांधकाम सुरु आहे.