Mohammad Shami, IND vs NZ: मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये फक्त सहावा सामना खेळत आहे. सेमीफायनल मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 4 विकेट घेत त्याने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याच्या पहिल्या दोन षटकांत त्याने संघाला पहिले दोन विके्स मिळवून दिल्या. त्यानंतर विल्यमसन आणि मिशेल क्रीझवर असताना तो आला आणि त्याने एकाच षटकात दोन बळी घेतले. त्याने विश्वचषकात 50 विकेट्सही पूर्ण केल्या.
दरम्यान, या विश्वचषकात सहाव्या सामन्यातच 20 विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. आता 50 विकेट घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच, तो जगातील सर्वात जलद 50 विश्वचषक विकेट घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने सर्वात कमी सामने आणि सर्वात कमी चेंडू अशा दोन्ही बाबतीत हा विक्रम आपल्या नावावर केला आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकले.
मोहम्मद शमीबद्दल बोलायचे झाल्यास, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत प्रभाव पाडत आहे. फक्त नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. याशिवाय, प्रत्येक सामन्यात त्याने विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्ध चार, श्रीलंकेविरुद्ध पाच आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन विकेट्स मिळाल्या.
विश्वचषकातील सर्वात जलद 50 विकेट्स (सामन्यानुसार)
17 सामने- मोहम्मद शमी
19 सामने- मिचेल स्टार्क
25 सामने- लसिथ मलिंगा
28 सामने- ट्रेंट बोल्ट
विश्वचषकातील सर्वात जलद 50 विकेट्स (बॉलनुसार)
795 चेंडू- मोहम्मद शमी
941 चेंडू- मिचेल स्टार्क
1187 चेंडू- लसिथ मलिंगा
1540 चेंडू- ग्लेन मॅकग्रा
1543 चेंडू- ट्रेंट बोल्ट
https://x.com/BCCI/status/1724815238049169854?t=xfMkBtoBNakbFYIHYYBY3Q&s=08
2 Comments