google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!

नवी दिल्ली :
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच, 7 मे रोजी भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली होती, अखेर या युद्ध कारवाईला विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. पाकिस्तानकडून 3.35 वाजता फोन आला, त्यानंतर आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करुन युद्धविरामाची माहिती दिली. तसेच, दहशतवादाविरूद्धची भारताची भूमिका आजही कायम असल्याचे पाकिस्तानला ठणकावलं आहे. ”भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गोळीबार आणि सैन्य दलाच्या कारवायांना थांबविण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविण्यात आली आहे. पण, भारताने सर्वच ताकदीनीशी दहशतवादाविरुद्ध आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केली. सैन्य कारवाया थांबल्या पण दहशतवादाविरुद्धची हीच भूमिका यापुढे देखील कायम राहिल”, असे ट्विट परराष्ट्रमंत्र्यांनी केलं आहे.

भारताने 7 मे रोजीच्या मध्यरात्री 1.30 वाजता पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसून एअरस्ट्राईक केला. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र टाकण्यात आले होते. या हल्ल्यात केवळ दहशतवाद्यांच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं होतं, सर्वसामान्य नागरिकांना कुठेही लक्ष्य करण्यात आलं नाही. मात्र, या हल्ल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतातील विविध शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्ने केला. मात्र, भारतीय सैन्य दलाने (Indian army) पाकिस्तानचा हा हल्ला नेतस्तनाबूत केला. त्यानंतर, दोन्ही देशातील तणाव अधिकच वाढला होता. एकीकडे सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार करण्यात येत होता. दुसरीकडे हवाई हल्लेदेखील सुरू होते. अखेर, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. राज्याचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी देखील ट्विट करुन याबाबत माहिती दिली. मात्र, दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका कायम अशीच राहिल, असेही एस. जयशंकर (Jaishankar) यांनी  सांगितलं आहे.

दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणावर होता. या तणावानंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू होते. अखेर, या हल्लेखोरीला अखेर युद्ध विराम मिळाला आहे.

पाकिस्तानचा फोन आला, काय म्हणाले परराष्ट्र सचिव?

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी 3:35 वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार 5 वाजतापासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज, या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.”. त्यामुळे, भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!