google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जगमहाराष्ट्र

Karanataka election results 2023: महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा झटका…

Karnataka Election Result Update:

अवघ्या महाराष्ट्रासह कर्नाटकचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला तगडा झटका बसला आहे. बेळगामध्ये एकीकरण समितीला सर्वच जागांवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 11 मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला असून 7 जागांवर भाजपची सरशी झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुरलीधर पाटील (खानापूर), रमाकांत कोंडूसकर (बेळगाव दक्षिण), अमर येळ्ळूरकर (बेळगाव उत्तर) आणि आर. एम. चौगुले यांना बेळगाव ग्रामीणमधून पराभव स्वीकारावा लागला आहे.

बेळगाव दक्षिणमधून भाजपचे आमदार अभय पाटील 11 हजार मतांनी विजय झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांना 64 हजारांवर मते मिळाली निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना अथणी मतदारसंघामधूनच काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी विजय मिळवला.

चिकोडीमधून काँग्रेसचे गणेश हुक्केरी यांनी विजय मिळवला. कुडचीमधून महेश तमन्नावार विजयी झाले आहेत. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विजय मिळवला. यमकनमर्डीमध्ये सतीश जारकीहोळी विजयी झाले.


बेळगाव जिल्हा निकाल
1) दक्षिण – अभय पाटील – BJP


2) खानापूर – विठ्ठल हलगेकर BJP

3) निपाणी – शशिकला जोल्ले BJP

4) गोकाक – रमेश जारकीहोळी-BJP

5) आरभावी – भालचंद्र जारकिहोळी – BJP

6) हुक्केरी – निखिल कित्ती BJP

7) अथणी – लक्ष्मण सौदी – CONG (भाजप बंडखोर)

8) कागवड – भरमगौडा कागे- CONG

9) कित्तुर -बाबासाहेब पाटील CONG

10 ) बैलहोनगल – महानतेश कौझलगे CONG

11) कुडची – महेंद्र तमन्नावर- CONG

12) सौदत्ती – विश्वास वैद्य- CONG

13) रामदुर्ग – अशोक पट्टण-CONG

14) यमकनगर्डी -सतीश जारहीहोळी CONG

15) चिकोडी – गणेश हुक्केरी CONG

16) बेळगाव ग्रामीण – लक्ष्मी हेब्बाळकर – CONG

17) उत्तर – राजू शेठ – CONG

18) रायबाग – दुर्योधन ऐवळे BJP

दुसरीकडे, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कर्नाटक पिंजून काढलेल्या काँग्रेसला मतदारांनी कौल दिला आहे. काँग्रेसने कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली असून एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर काँग्रेस 133 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 65 जागांवर आघाडीवर आहे. जनता दल सेक्युलर 22 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, भाजपकडून आमदार फोडाफोडीचा आजवरचा देशातील इतिहास पाहता काँग्रेसकडून अत्यंत काळजी घेतली जात आहे. आमदारांना आजच सायंकाळी बंगळूरमध्ये एकत्र करण्याचा निर्णय घेत काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे. काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांनी एबीपी न्यूजला दुजोरा दिला आहे. काँग्रेसने निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर उद्याच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!