#SPEAKSIGN प्रती प्रेरित करण्यासाठी केएफसीचा विशेष प्रयत्न…
पणजी:
इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेजेसनिमित्त केएफसी इंडिया स्वत:ची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ब्रॅण्ड मालमत्ता आयकॉनिक बकेटचा वापर करत इंडियन साइन लँग्वेजबाबत जागरूकतेचा प्रसार करत आहे. विशेषरित्या डिझाइन केलेल्या साइन लँग्वेज बकेटमध्ये सामान्यपणे वापरले जाणारे शब्द व वाक्यांचे स्टेप-बाय-स्टेप व्हिज्युअल ट्यूटोरिअल्स आहे, ज्यामधून ग्राहकांना इंडियन साइन लँग्वेज (आयएसएल) मध्ये संवाद साधण्याची पद्धत शिकण्याची संधी देण्यात आली आहे.
‘हॅलो’, ‘प्लीज’, ‘गुड मॉर्निंग’, ‘हाऊ आर यू’, ‘हॅव ए गुड डे’, ‘एलओएल’, ‘व्हॉट्स अपॽ’ यांसारखे शब्द, तसेच संख्या व आकार बकेटवर मध्यस्थानी आहेत. विशेषरित्या डिझाइन करण्यात आलेले साइन लँग्वेज बकेट्स या आठवड्यात भारतातील सर्व केएफसी रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध असतील.
साइन लँग्वेज बकेट आणि #SpeakSign मोहिम हे केएफसी इंडियाच्या क्षमता उपक्रमाचे भाग आहेत, ज्याचा व्यक्तींच्या क्षमता अधिक निपुण करण्याचा, तसेच लैंगिक व क्षमतेमधील तफावत दूर करण्याचा मनसुबा आहे. क्षमता उपक्रमाच्या माध्यमातून केएफसी इंडिया आपल्या रेस्टॉरंट्समध्ये महिलांना आणि मूक व श्रवणदोष असलेल्या व्यक्तींना काम देत सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहे.