
‘काळजी उसवलां – म्हजे नदरेतल्यांन’चे आज प्रकाशन
पणजी :
प्रसिद्ध कोंकणी कवी आणि ललितलेखक उदय म्हांबरो यांनी लिहिलेल्या ‘काळीज उसवलां’ या आत्मपर आठवणींच्या पुस्तकासंबंधी आस्वादनात्मक लेख आणि पत्रांचे संपादित पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. १९) संध्याकाळी ४ वा. आर्ला, केरी येथील ट्रॉपिकल स्पायस प्लांटेशन येथे होणार आहे. ‘काळीज
उसवलां – म्हजे नदरेंतल्यान’ हे पुस्तक काशिनाथ नायक यांनी संपादित केले आहे.
संजना पब्लिकेशन्स आणि मित्रमंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप बोरकर असतील. तर रवींद्र केळेकर ज्ञानमंदिरचे मुख्याध्यापक अनंत अग्नी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच ऊर्जा फाउंडेशन आणि इकोट्रेक संस्थेचे संस्थापक दुर्गादास परब निमंत्रित पाहुणे असतील. कार्यक्रमाला वाचकांनी आवर्जून उपस्थित रहावे, अशी विनंती संजना पब्लिकेशन्सचे दिनेश मणेरकार आणि मित्रमंडळाचे निमंत्रक रोहिदास सतरकार यांनी केली आहे.
