Mahadayi issue: म्हादईच्या मुद्द्यावर सिद्धरामय्या- मोदींची भेट
Mahadayi issue : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन ”म्हादईच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेऊन प्रकल्पाला लवकरात लवकर पर्यावरणीय मंजुरी द्यावी” अशी मागणी केलीय.
पंतप्रधानांनी मंजुरी दिल्यास म्हादई प्रकल्प (Mahadayi issue) पुढे जाऊ शकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. म्हादई हा विषय अगोदरच गॅझेटमध्ये असून दुसरा अन्य कोणताही साइड ब्लॉक नाही.
या कामासाठीची निविदा काढण्यात आली असून फक्त ‘पर्यावरणीय मंजुरी’ हा विषय प्रलंबित आहे. केंद्राकडून मंजुरी मिळताच हे काम सुरू करता येईल असे देखील त्यांनी म्हटल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर झालंय.
कर्नाटक राज्याला दुष्काळमुक्ती मिळाली पाहिजे यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली उच्च शक्ती समितीच्या बैठकीची मागणी त्यांनी केली होती.
पण केंद्राला तीन वेळा आवाहन केले तरी प्राथमिक बैठक घेतली गेली नाही म्हणूनच आम्ही पंतप्रधानांना विनंती करुन तातडीने बैठक घेऊन भाग दुष्काळमुक्त करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलंय.