
देश/जग
सोनिया गांधी यांच्या मातोश्रींचे निधन
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांचे निधन झाले आहे. शनिवारी 27 ऑगस्ट रोजी त्यांचे इटलीमध्ये निधन झाले आणि मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या सोनिया गांधीही परदेशात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनाला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
जयराम रमेश यांनी सांगितले की, ‘सोनिया गांधी (Sonia Gandhi) उपचारासाठी परदेशात गेल्या असून यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी त्यांच्यासोबत आहेत.’ सोनिया गांधी बहुधा आईच्या मृत्यूपूर्वी त्यांना भेटणार होत्या. त्या त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार होत्या. दुसरीकडे मात्र, सोनिया गांधी यांच्या आईचे निधन आणि त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.