‘आनंदाचा शिधा गरिबांच्या घरी आनंद आणणार का ?’
सातारा:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी शंभर रुपयांत आनंदाचे किट देण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र सातारा जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या वतीने राशन धान्य दुकानदारांना अद्याप हे आनंदाचे दिवाळी किट न पोहोचल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन जिल्हा प्रशासन आनंदाचा शिधा या दिवाळीत गरिबांच्या घरी आनंद आणणार का? असा सवाल केला.
यावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी युध्दपातळीवर यंत्रणा काम करत असून प्रत्येकाला दिवाळी आधीच हे पोहचेल असे आश्वासन दिले . जर कोणाला दिवाळी पुर्वी आनंदाचे किट मिळाले नाही किंवा किट मधील एखादी वस्तू कमी आल्यास पुरवठा विभागाकडे किंवा तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्याचे आव्हान स्नेहा किसवे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
पुरवठा विभागाच्या अपुर्या पुरवठ्याने जन सामान्यांचा आनंद हेरावला , आणि सर्व सामान्य गोरगरिबांसाठी आलेलं आनंदाचे किट जिल्ह्यातील गोरगरिबांकडे पोहचले नाही , तेल आले तर डाळ अशी परिस्थिती असल्याने आनंदाचे संपूर्ण किट जनतेपर्यंत पोहचणार कधी ? अशी परिस्थिती आहे