एमपीएलने घातली तब्बल ‘इतक्या’ खात्यांवर बंदी
मुंबई :
एमपीएल या जगातील आघाडीच्या मोबाइल ईस्पोर्ट्स व डिजिटल गेमिंग व्यासपीठाने फसव्या खात्यांविरोधात कठोर कारवाई करत सुरक्षित व विश्वसनीय गेमिंग वातावरण देण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. गेल्या तिमाहीमध्ये एमपीएलने २००,००० हून खात्यांवर कायदेशीर बंदी आणली, ज्यामुळे त्यांच्या १ दशलक्षहून अधिक बंदी घातलेल्या खात्यांच्या मागील रेकॉर्डमध्ये भर झाली. यापैकी जवळपास ९ टक्के खाती महाराष्ट्रातील होती, ज्यामधून एमपीएलचे राज्यामधील गेमर्सना सुरक्षित व विश्वसनीय गेमप्ले प्रदान करण्याची खात्री घेण्याप्रती प्रयत्न दिसून येतात.
एमपीएलच्या सुरक्षितता व अनुपालनाचे उपाध्यक्ष रूचीर पटवा म्हणाले, ‘‘एमपीएलचा खेळाडू-केंद्रित दृष्टिकोन आमच्या निष्पक्ष खेळाप्रती, तसेच आमच्या वापरकर्त्यांसाठी गेमिंग अनुभवामध्ये अडथळा आणणाऱ्या फसव्या पद्धतींविरोधात कोणतीही सहिष्णुता न दाखवण्याप्रती अविरत कटिबद्धतेला चालना मिळते. आम्ही सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी अनेक उपाययोजना सादर करतो. जीपीएस आयडेण्टिफिकेशन, प्रबळ केवायसी तपासणी व मशिन लर्निंग-आधारित पॅटर्न रिकग्नशन अशा प्रगत तंत्रज्ञानांच्या माध्यमातून आम्ही सक्रियपणे फसव्या कृती ओळखतो व त्यांचे निर्मूलन करतो, ज्यामधून आमच्या सर्व बहुमूल्य गेमर्सना लेव्हल-प्लेईंग फिल्डची खात्री मिळते.’’
एमपीएल बहुआयामी दृष्टिकोनाच्या माध्यमातून गेमप्लेच्या प्रामाणिकतेचे संरक्षण करते. प्लॅटफॉर्म मिलीभगत टाळण्यासाठी जीपीएस आयडेण्टिफिकेशनचा वापर करते. नजीकच्या वापरकर्त्यांना एकाच टेबलमध्ये सामील होण्याची परवानगी नाही. तसेच डायनॅमिक टेबल अलोकेशन खात्री देते की, जे खेळाडू वारंवार एकत्र खेळतात आणि सातत्याने जिंकतात किंवा हरतात त्यांना वेगवेगळ्या टेबलमध्ये ठेवले जाते. मुळात फसव्या कृतींना रोखण्यासाठी एमपीएल केवायसी आणि दस्तऐवजीकरण तपासणी यांसारख्या यंत्रणांचा अवलंब करते.
समान केवायसी दस्तऐवज वापरून अनेक प्रोफाइल्स तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्म कायमस्वरूपी ब्लॉक करतो. याव्यतिरिक्त, एमपीएल फसव्या कृतींसाठी पूर्वी ज्या डिवाईसमधून फसवेगिरी केली होती, त्या डिवाईसमधून साइन इन करणा-या वापरकर्त्यांना प्रतिबंध करते. मशिन लर्निंगचा लाभ घेत एमपीएल संशयास्पद खेळण्याचे नमुने प्रदर्शित करणा-या वापरकर्त्यांना त्वरित ओळखते आणि त्यांना गेममधून काढून टाकते.