एअर एशियाने केले ‘युपी’ला जवळ
नवी दिल्ली:
एअरएशिया इंडियाने लखनौमध्ये आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. लखनौ ते बंगलोर, दिल्ली, गोवा, कोलकाता आणि मुंबई या शहरांपर्यंतची थेट उड्डाणे एअरएशिया सुरु करत आहे, ज्यांचे शुल्क ४०६४ रुपयांपासून पुढे आहे. या उड्डाणांचे संचालन ५ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होईल. या उड्डाणांच्या शुभारंभाच्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या शुल्कांसह सर्व प्रमुख बुकिंग चॅनेल्सवर बुकिंग सुरु झाले आहे. नेउ पास टाटा नेउचा रिवॉर्ड्स प्रोग्राम आहे, ज्यामध्ये सदस्यांना अतिरिक्त सूट, ५% अश्यूअर्ड नेउ कॉईन्स आणि निःशुल्क रेड कार्पेट प्रायॉरिटी सर्व्हिस मिळते.
नेउ पास सदस्यांबरोबरीनेच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लघु व मध्यम व्यावसायिक, डिपेन्डन्ट्स आणि सशस्त्र बलांचे कर्मचारी देखील airasia.co.in वर विशेष शुल्काचे लाभ मिळवू शकतात. आपल्या प्रवाशांना आकर्षक डील्स, अनोखे लाभ आणि उत्कृष्ट मूल्य प्रस्तुत करत ही एअरलाईन प्रवाशांना मिळणाऱ्या अनुभवांमध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बंगलोर, दिल्ली, गोवा, कोलकाता आणि मुंबईसाठी नॉनस्टॉप कनेक्टिविटी देण्याबरोबरीनेच एअरएशिया इंडिया लखनौला आपल्या नेटवर्कमधील श्रीनगर, कोचीन, हैदराबाद, गुवाहाटी आणि इतर शहरांसोबत सुविधाजनक वन-स्टॉप आयटीनरीजमार्फत जोडणार आहे.
या घोषणेबाबत एअरएशिया इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर अंकुर गर्ग यांनी सांगितले, “आमच्या नेटवर्कमध्ये लखनौचा समावेश करून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. उत्तर प्रदेशात आम्ही ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात करत आहोत. भविष्यात प्रवास क्षेत्रात दिसून येत असलेल्या प्रचंड संधी लक्षात घेऊन आम्ही नवे डेस्टिनेशन म्हणून लखनौची निवड केली. लखनौहुन बंगलोर, दिल्ली, गोवा, कोलकाता आणि मुंबईपर्यंत ११२ साप्ताहिक थेट उड्डाणे आमच्या प्रवाशांना सुविधाजनक आणि आनंददायी हवाईप्रवासाचा अनुभव प्रदान करतील. आमच्या कुशन्ड व आरामदायी सीट्स, आमच्या पुरस्कार विजेत्या ‘गौरमैर’ मेन्यूतील ओव्हन-हॉट मील्सची विशाल श्रेणी आणि नेउ पासचे लाभ उत्तर प्रदेशातील प्रवाशांना अनोखा अनुभव प्रदान करतील.”