आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारला असून बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या अगोदर फागू चौहान हे बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. आता फागू चौहान यांच्याकडे मेघालय राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजेंद्र आर्लेकर यांना बिहारचे राज्यपाल बनवण्याची अधिसूचना राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आली आहे. राजेंद्र आर्लेकर हे बिहारचे 41 वे राज्यपाल असतील.
राजेंद्र आर्लेकर मूळचे गोव्याचे आहेत. 2002 ते 2007 पर्यंत ते आमदार आणि 2012 ते 2015 पर्यंत गोवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ऑक्टोबर 2015 ते 2017 या काळात ते वन, पर्यावरण आणि पंचायती राज्यमंत्री होते. यानंतर त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आले.
फागू चौहान यांनी 2019 मध्ये बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. दरम्यान, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. भाजपला सोडचिठ्ठी देत नितीशकुमार यांनी महाआघाडीशी हातमिळवणी केली.
…