गोवा

दिवाळीपूर्वी अन्नधान्याचे वेळेवर वितरण सुनिश्चित करा : प्रभव नायक

मडगाव : दिवाळी अगदी जवळ आली असताना, गोव्यातील शासकीय वितरण प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे सवलतीच्या दरात अन्नधान्य वाटपात होत असलेल्या विलंबाबद्दल मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.


स्वस्त धान्य दुकानांना अन्नधान्य वितरणात झालेल्या विलंबाची माहिती देण्यासाठी नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याने आज जारी केलेल्या सूचनेवर प्रतिक्रिया देताना, प्रभव नायक म्हणाले की खात्याने सदर अडचण लोकांसमोर जाहिर केली हे चांगले असले तरी, दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात जनतेला गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने सुधारात्मक पावले उचलली पाहिजेत.


अशा प्रकारच्या अडचणींमुळे, विशेषतः सणासुदीच्या काळात, शासकीय वितरण योजनेवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. “दिवाळी हा आनंद आणि एकत्रतेचा सण आहे, मूलभूत गरजांची चिंता करण्याचा काळ नक्कीच नाही,” असे प्रभव नायक यांनी सांगितले.


मडगावचो आवाजने खात्याला तातडीने कारवाई करून सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक रेशनकार्डधारकास त्यांचे हक्काचे अन्नधान्य दिवाळीपूर्वीच मिळावे यासाठी वितरण प्रक्रिया सुरळीत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.


“सरकारने कोणत्याही कुटुंबाला सणाच्या काळात गैरसोय होणार नाही याची जबाबदारी घ्यावी. आवश्यक वस्तूंचे वेळेवर वितरण ही केवळ जबाबदारी नसून, असंख्य कुटुंबांसाठी सन्मान आणि दिलास्याचा प्रश्न आहे,” असे प्रभव नायक यांनी सांगितले, तसेच मडगांवचो आवाज नेहमी गोमंतकीयांच्या हक्कांसाठी व समस्यांवर आवाज उठविण्यासाठी सज्ज असल्याचा पुनरुच्चार केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!