अर्थमत/ टेक्नॉलॉजी

पार्क अव्हेन्यूचा 4X प्रीमियम परफ्यूम रेंजसह डिओड्रंट्समध्ये श्रेणी विस्तार

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (GCPL) यांचा एक अग्रगण्य परफ्यूम आणि डिओ ब्रँड पार्क अव्हेन्यू फ्रॅग्रन्सेस किफायतशीर किंमतीत प्रीमियम फ्रॅग्रन्स कामगिरीवर लक्ष केंद्रित करून आता पुरुषांच्या डिओड्रंट श्रेणीमध्ये आपला ठसा अधिक सखोल उमटवत आहे. बाजारपेठ म्हणजेच ग्राहक आता अधिकाधिक अनुभवाधारित आणि चोखंदळ वापराच्या दिशेने जात असताना पार्क अव्हेन्यू आपल्या डिओड्रंट पोर्टफोलिओचा पुनर्विचार करत आहे आणि आपल्या श्रेणीत पुढील वाटचाल करण्यासाठी सज्ज आहे. अ‍ॅमेझॉन वूड्स या 4X प्रीमियम परफ्यूम स्प्रे च्या सादरीकरणातून याची सुरुवात होत आहे. अत्याधुनिक फ्रॅग्रन्स कामगिरी आणि मूल्य यांच्या जोडीला आता नव्या, प्रीमियम पॅकेजिंगसह सादर करत फॉरमॅटमध्ये झालेला एक मोठा बदल यातून दिसून येतो.


विश्वास आणि समर्पकता यांची परंपरा लाभलेल्या पार्क अव्हेन्यू फ्रॅग्रन्सेसने आज भारताच्या 2800 कोटी रु. च्या डिओड्रंट बाजारपेठेमध्ये भक्कम स्थान निर्माण केले आहे. आधुनिक पुरुषांसाठी उच्च कामगिरी करणारी ग्रूमिंग उत्पादने तयार करण्याच्या परंपरेवर आधारित या ब्रँडने आजच्या आत्मविश्वासाने वाटचाल करणाऱ्या, स्टाईल बाबत जागरुक असलेल्या ग्राहकांसाठी आता नवीन फॉरमॅट्स आणि वास वा गंध अनुभवांसह कॅटेगरीमध्ये मोठा विस्तार सुरू केला आहे.


हा कॅटेगरी पुश फ्रॅग्रन्स नाविन्यपूर्णतेद्वारे पुढे नेला जात आहे. डिओड्रंटच्या किंमतीत उत्कृष्ट, दीर्घकाळ टिकणारे परफ्यूम्स उपलब्ध करून देणे हा यामागे एक स्पष्ट उद्देश आहे. यामध्ये  अ‍ॅमेझॉन वूड्स आघाडीवर असून 225 रु. मध्ये 4X प्रीमियम परफ्यूम स्प्रे उपलब्ध आहे. इतर डिओ परफ्यूम स्प्रेशी तुलना करता अ‍ॅमेझॉन वूड्स प्रत्येक स्प्रेमध्ये चारपट जास्त परफ्यूम कॉन्सन्ट्रेशन देत आहे. त्यामुळे ग्राहकांची मूलभूत अपेक्षा पूर्ण होते. हा डिओ केवळ नको असणारा गंध झाकत नाही, तर स्वतःचा ठसा उमटवतो.


या फ्रॅग्रन्समध्ये लेमन (लिंबू), मँडरीन, बर्गामोट आणि टी या सायट्रस टॉप नोट्स, ऑरिस, नटमेग (जायफळ) आणि सिनामन (दालचिनी) यासारख्या स्पायसी हार्ट नोट्स, तसेच सॅंडलवूड (चंदन), पचौली, वेटीवर (वाळा), अंबरग्रीस आणि मस्क (कस्तुरी) या पॉवरफुल बेस नोट्सचा समावेश आहे. यामुळे रोजच्या दिवसाला ग्रूमिंग, सौंदर्यप्रसाधनासारखी गरजेची गोष्ट म्हणून पुरुषांना हा एक धाडसी आणि तरीही संतुलित पर्याय ठरत आहे.


“फ्रॅग्रन्स श्रेणीतील ग्राहकांना अशा अतुलनीय सुगंधांची अपेक्षा असते जे खरोखरच दीर्घकाळ टिकतात. या मौल्यवान माहितीच्या अनुषंगाने प्रेरित होऊन अ‍ॅमेझॉन वूड्स हे पार्क अव्हेन्यूच्या रेंजमधील एकदम नवीन उत्पादन सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. याचा सुगंध दीर्घकाळ टिकणारा असल्यामुळे ग्राहकांची पसंती भरभरून मिळत आहे. याची किंमतदेखील अतिशय परवडणारी आहे,” असे गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (GCPL) चे मार्केटिंग – पर्सनल केअर प्रमुख नीरज सेनगुट्टुवन यांनी सांगितले.


पार्क अव्हेन्यूच्या विस्ताराच्या धोरणात जनरल ट्रेड (GT) चॅनेल्सवर लक्ष केंद्रित केले जाईल.  येथे उच्च कामगिरी पण परवडणाऱ्या किंमतीतील फ्रॅग्रन्सेससाठी मागणी वेगाने वाढते आहे. ब्रँडचे उद्दिष्ट डिजिटल पोहोच आणि रिटेल अ‍ॅक्टिव्हेशनच्या मिश्रणातून तरुण, महत्त्वाकांक्षी ग्राहकांशी संवाद साधण्याचे आहे.


पार्क अव्हेन्यू अ‍ॅमेझॉन वूड्स टीव्हीसीची संकल्पना गोदरेज क्रिएटिव्ह लॅबची असून यामध्ये अभिनेता इशान खट्टर कॉर्पोरेट संदर्भातील एका सुसंगत प्रसंगात दिसतो. तो आपल्या बॉससमोर सादरीकरण करणार असताना, त्याला धक्का बसतो कारण बैठकीला आणखी तीन वरिष्ठ नेते सहभागी झालेले असतात. एक सहकारी त्याला चिडवत म्हणतो की आता तुला चारपट अधिक  लोकांवर प्रभाव पाडावा लागेल. इशान मात्र न घाबरता पार्क अव्हेन्यू अ‍ॅमेझॉन वूड्स 4X प्रीमियम परफ्यूम स्प्रे वापरतो आणि ठामपणे सांगतो की तो आता चारपट जास्त टाळ्या मिळवणार. या टीव्हीसी मधून असे दाखवण्यात आले आहे की हा फ्रॅग्रन्स चारपट जास्त आत्मविश्वास देतो आणि दडपणाला उत्तम कामगिरीमध्ये रूपांतरित करतो.


पार्क अव्हेन्यू डिओड्रंट कॅटेगरीमध्ये आपले स्थान मजबूत करत आहे. भारतभरातील पुरुषांसाठी आत्मविश्वास, ग्रूमिंग आणि दैनंदिन शालीनता यांचा संगम साधणे ही ब्रँडची मोठी आकांक्षा सुस्पष्ट आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!