google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

Parliament Attack : संसदेत घुसले दोन अज्ञात

Parliament Attack: देशाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभाचं  (Loksabha Session) कामकाज सुरु असताना दोन अज्ञातांनी संसदेत (Parliament Attack) उडी मारली. त्यांच्या हातात काहीतरी सामान होतं. अज्ञात व्यक्तीने खासदार बसत असलेल्या बेंचवरुन उड्या मारत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक आणि खासदारांनी मिळून या व्यक्तीला पकडलं आणि पोलिसांकडे सोपवलं. या घटनेनंतर लोकसबेची कार्यवाही स्थगित करण्यात आली. संसदेवर हल्ला (Parliament Attack) झाल्याच्या घटनेला आज बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आजच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

सभागृहाचे सदस्य नसताना तीन अज्ञात व्यक्ती संसदेत घुसल्याने संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दोन आरोपींना अटक करण्यात आलं असू यापैकी एकाच नाव  सागर असल्याचं समजतंय. दोन्ही आरोपींना संसद मार्ग पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आलं. कोणत्या उद्देशाने हे दोन आरोपी संसे घुसले याचा पोलीस तपास करत आहेत.

या घटनेने विरोधी पक्षातील खासदारांनी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांनी लोकसभेत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली. साधारण 20 वर्षांचे दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून संसदेत उढील मारली. त्यातल्या एकाच्या हातात स्मोकगन होती. या स्मोकगन होती. यातून पिवळा धुर निघत होता. यातला एक तरुण लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता आणि काहीतरी घोषणाबाजी करत होता. हा धुर विषारी होता का याबात अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

संसदेत उडी मारणाऱ्या तरुणाने प्रेक्षक गॅलरीतून संसदेक उडी मारली. त्या तरुणाचं नाव सागर असं आहे. मैसूरचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावावर तो संसदेत घुसला होता.

धक्कादायक म्हणजे लोकसभेच्या बाहेरही एक तरुण आणि एका तरुणीने घोषणाबाजी केली. दोघांनाही अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव अमोल शिंदे असं आहे. अमोल शिंदे 25 वर्षांचा असून तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. अटक करण्यात आलेल्या मुलीचं नाव निलम असं आहे ही हिसारमधली राहाणारी असून तीचं वय 42 आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!