गोवा

गणेशोत्सव पॅंडल स्कॅंडलवरुन प्रभव नायक यांचा दिगंबर कामतांवर टिकास्त्र

मडगाव: मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगावचे आमदार आणि मंत्री दिगंबर कामत यांच्यावर तीव्र टीका करताना आरोप केला की त्यांनी “सर्व देवांची फसवणूक केली.” नायक म्हणाले की कामत हे स्वतःला नेहमी धार्मिक आणि भक्तिभावाने जोडलेले व्यक्ती म्हणून दाखवतात, पण देवांनाच फसविणाऱ्या अशा व्यक्तीस इतरांना धर्म, श्रद्धा आणि नैतिकतेवर उपदेश करण्याचा कोणताही अधिकार नाही.


गणेशोत्सव पॅंडल स्कॅंडलची मडगांवचो आवाज तर्फे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार मडगावच्या आमदार निधी योजनेअंतर्गत ७५ लाख रुपयांच्या गणेशोत्सव मंडप घोटाळ्याबाबत असून, सार्वजनिक निधीचा राजकीय वा वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. धार्मिक सणांच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांचा वैयक्तीक फायद्यासाठी वापर करणे हे अनैतिक असून गणेशोत्सवाच्या पवित्रतेचा अपमान आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.


“गणेशोत्सव हा भक्ती, एकता आणि समाजबंध दृढ करण्याचा सण आहे, भ्रष्ट नेत्यांच्या राजकीय तिजोरी भरण्याचा नाही,” असे प्रभव नायक म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की दिगंबर कामत यांनी वारंवार धर्माचा वापर राजकीय फायद्यासाठी केला असून, ही कृती देवांचा आणि जनतेच्या श्रद्धेचा विश्वासघात आहे.


सदर घोटाळा उघड झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी मौन बाळगण्यावर  प्रश्न उपस्थित करत, आमदार निधी योजनेअंतर्गत झालेल्या सर्व खर्चाची तात्काळ पारदर्शक माहिती जाहीर करण्याची मागणी प्रभव नायक यांनी केली आहे. “सार्वजनिक पैशाचा प्रत्येक रुपया हिशोबात यायलाच हवा. मडगावकरांना प्रामाणिक आणि पारदर्शक शासन हवे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!