‘बाय रोशनी नाईक यांनी दिली नव्या विचारांना दिशा, त्यांना सलाम’
मडगाव :
बांदोड्याचे माजी पंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व वृत्तपत्र विक्रेते रोहिदास नाईक यांच्या निधनाने मला दु:ख झाले. आपल्या प्रिय पतीचे अंत्यसंस्कार करणाऱ्या त्यांच्या पत्नी रोशनी नाईक यांना माझा सलाम. मी त्यांच्या दु:खात सहभागी आहे. आज रोशनी नाईक यांनी इतरांना मार्ग दाखवला आहे. परमेश्वर तिला आशीर्वाद देवो, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
फोंडा येथील दिवंगत वृत्तपत्र विक्रेते रोहिदास नाईक यांच्या पत्नी रोशनी नाईक यांनी आपल्या पतिवर अंत्यसंस्कार केल्याची दखल घेत युरी आलेमाव यांनी समाजाने त्यांचे कौतुक करण्याचे आवाहन केले आहे.
Saddened by the passing away of former Bandora Panchayat Member, Social Worker & Newspaper Vendor Bab Rohidas Naik. My respect to his wife Bai Roshani Naik who performed the last rites of her beloved husband. I share her grief. She has shown the way. May almighty bless her. pic.twitter.com/1c8rasJi2d
— Yuri Alemao (@Yurialemao9) October 29, 2022
काही जुन्या चालीरीती बंद करण्याची आता वेळ आली आहे. रोशनी नाईक यांनी इतरांना मार्ग दाखवला आहे. तिच्या या निर्णयामुळे आता अधिकाधिक महिलांना त्यांच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींचे अंतिम संस्कार करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
मी गेल्या विधानसभा अधिवेशनात गोव्यातील विधवा स्त्रीयांच्या भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि विधवांना इतर विवाहित महिलांच्या बरोबरीने वागणूक मिळावी यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी विनंती केली होती. आपल्याला आता आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन युरी आलेमाव यांनी केले.
मी गोवा महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक स्त्रीचा समान आदर करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची विनंती करेन, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.