शेर शिवराज, आरआरआर आणि द कश्मीर फाइल्स असणार यंदाच्या इंडियन पॅनोरमा मध्ये…
नवी दिल्ली:
53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) लवकरच सुरू होणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. गोव्यामध्ये हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.
यंदा इफ्फीमध्ये तीन मराठी चित्रपटांचे स्क्रिनिंग होणार आहे. तसेच आरआरआर आणि द कश्मीर फाइल्स हे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेले चित्रपट देखील या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवले जाणार आहेत. पाहूयात 53 व्या इफ्फीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी.
थ्री ऑफ अस, द स्टोरी टेलर, मेजर, सिया, द कश्मीर फाइल्स या फीचर फिल्म्स 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. तर काही हिंदी भाषेतील नॉन फीचर फिल्म्स देखील दाखवल्या जाणार आहेत.
25 feature films and 20 non-feature films to be screened during the 53rd International Film Festival of India (IFFI) from 20th-28th November in Goa.
— ANI (@ANI) October 22, 2022
The opening non-feature film of Indian Panorama, 2022 is ‘The Show Must Go On’ (English) directed by Divya Cowasji. pic.twitter.com/vTMspCqIkB
यंदा इफ्फी या चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी या फिचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. फ्रेम, शेर शिवराज, एकदा काय झालं आणि धर्मवीर या मराठी फीचर फिल्म्सचं स्क्रिनिंग या महोत्सवात होणार आहे. तर रेखा ही नॉन फीचर मराठी फिल्म देखील यंदा इफ्फीमध्ये दाखवली जाणार आहे.
तसेच इतर भाषांमधील काही फिचर फिल्म्स आणि नॉन फीचर फिल्म्सचे स्क्रिनिंग देखील या चित्रपट महोत्सवात होणार आहे. त्याच बरोबर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गोव्यात आयोजित केलेल्या या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) मध्ये नवीन प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांना आमंत्रित केले जाणार आहे. या महोत्सवात ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ नावाचा विभाग सुरू केला. चित्रपटसृष्टीशी निगडीत कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.