चोराडे फाट्यावर झाली अपघातात वाढ
खटाव तालुक्यातील चोराडे गावातुन विटा-महाबळेश्वर हा नव्याने झालेल्या राज्यमार्गामुळे चोराडे फाटया वरुन वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातात वाढ झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुस स्पीड बेकर बसवण्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
या मार्गावर वाहनांना कोणत्याही प्रकारच्या वेगाचे बंधन राहिले नसल्याने सातत्याने अपघातांची मालिका सुरुच आहे. या रस्त्यावरून जाताना पादचारी,दुचाकी चालक यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी अनेकांना अपंगत्व आले आहे.मात्र, या रस्त्याला कोठेही वेग मर्यादिचे फलक लागलेले नाहीत. धोकादायक ठिकाणांचे फलक नाहीत, त्यामुळे सातत्याने अपघात पहावयास मिळत आहेत.
या रस्त्यावर जागोजागी वाहनांची वेग मर्यादा आटोक्यात आणण्यासाठी गतिरोधक पट्टे तयार करण्याची गरज आहे. हा रस्ता चांगला असल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे.
मात्र, या ठिकाणीही वाहनांची गती कमी करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. या रस्त्यावर जागोजागी गतिरोधकाचे पट्टे मारावेत, धोकादायक ठिकाणे व वेग मर्यादेचे फलक लावावेत,
तसेच विटा- महाबळेश्वर व पाटण- पंढरपूर दोन्ही राज्यमार्गामुळे चोराडे फाटा बनला आहे. या चौकात भरधाव वेगाने वाहने रस्त्यावरून जातात. त्यामुळे या रस्त्यावरिल चोराडे फाट्यावर रस्त्याच्या मधोमध सर्कल बणवण्यात यावे अशी मागणी होत आहे.