कोयना वसाहत मलकापूरात चोरट्यांचा धुमाकूळ बंद ; लाखोंवर डल्ला…
कराड (अभयकुमार देशमुख):
कोयना वसाहत येथील पाच मंदिर परिसरात चोरट्यानी धुमाकूळ घातला असून मंगळवारी रात्री तब्बल तीन बिल्डिंग मधील फ्लॅटचे बंद दरवाजे तोडून चोरट्याने आत प्रवेश करून लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
घरातील लोक बाहेर गेल्याचे पाहून चोरट्यानी हात साफ केला आहे कोयना वसाहत मधील राजगड या बिल्डिंग मधील अमित महापुरे यांच्या फ्लॅटची कडी तोडून चोरट्याने आत प्रवेश करून साहित्य विस्कटून टाकले तसेच सुमारे नऊ ते दहा तोळे सोन्यावर डल्ला मारला अमित मंगळवारी सायंकाळी कुटुंबासमवेत कोल्हापूरला गेले होते हीच संधी साधून चोरट्याने बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकले व तिजोरीत असणाऱ्या दागिन्यांवर हात साफ केला आहे.
दरम्यान कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पीएसआय आर एस पवार पोलीस कर्मचारी संजय जाधव व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.. शेजारी असणाऱ्या बिल्डिंगमध्येही चोरट्याने फ्लॅट फोडला मात्र त्या ठिकाणी कुणीच राहत नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.