‘असा’ साजरा होणार जिल्हा बँकेचा अमृत महोत्सव…
सातारा (महेश पवार) :
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक 15 ऑगस्ट2023 रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने आगामी वर्षभरात या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, बँकेचे संचालक विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर ,प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजापुरे, दत्तानाना ढमाळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नितीन पाटील बोलताना पुढे म्हणाले 15 ऑगस्ट 2023 रोजी बँक अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे . या महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्यदिनाच्या पूर्वसंध्येला कराड ते सातारा यशवंत ज्योत आणण्यात येणार असून . या ज्योतीचे प्रज्वलन येथील यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळ प्रीतीसंगम कराड येथे करण्यात येणार आहे . तेथून ही ज्योत राष्ट्रीय महामार्गावरून बँकेचे शंभर कर्मचारी साताऱ्यात आणणार आहे . ही ज्योत राजवाडा येथील प्रतापसिंह महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पोवई नाका येथील शिवछत्रपती पुतळा,आबासाहेब वीर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून सकाळी आठ वाजता ज्योत बँकेच्या आवारात येणार आहे . या ज्योतीचे स्वागत रामराजे नाईक निंबाळकर करणार आहेत . येथे सकाळी आठ वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मुख्य कार्यालय होणार आहे .
शेतकऱ्यांना कर्ज योजनांची माहिती देणाऱ्या अमृतकुंभ पुस्तिकेचे प्रकाशन केले जाणार आहे सप्टेंबर 2023 ते जून 2024 या कालावधीत ऊस उत्पादन वाढीसाठी जिल्हा बँक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व जिल्ह्यातील साखर कारखाने यांच्या समितीने विद्यमाने मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन केले आहे . ऑक्टोबर 2023 मध्ये कृषी पर्यटन मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला एमटीडीसी व्यवस्थापक एस आर करमरकर ऍग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन पुणे यांचे पांडुरंग तावरे व वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र सोलापूर यांचे राजू भंडार कवठेकर यांना आमंत्रण देण्यात आले आहे . नोव्हेंबर 2023 मध्ये कृषी विद्यापीठातील तज्ञांचे मार्गदर्शन जानेवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा त्यानंतर आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन फेब्रुवारी 2023 मध्ये बनवलेली लागवड योजना व क्षारपड जमीन सुधार योजना या अनुषंगाने शेतकरी मेळावा आयोजित केला आहे याशिवाय जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी सुशिक्षित बेरोजगार मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रोजगार संधी मेळावा महिला बचत गट मेळाव्या व प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत
जिल्हा बँकेने विकास सेवा संस्थांकरता विशेष कार्यक्रम राबविण्यात ठरवले आहे वसुली हंगामात वसुलीचे नियोजन करून 30 जून 2024 पर्यंत संस्था पातळीवर 95 टक्के पेक्षा जास्त वसुली करणे संस्थांची नफाक्षमता वाढविणे व मार्च 2024 अखेर बँक संलग्नित 960 विकास सेवा संस्थांना संस्थांना लाभांश वाटप करणे इत्यादी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे शेतकरी उत्पादक कंपन्या बँकेच्या प्रवाहात आणून त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे जिल्ह्यातील पगारदार नोकर पतसंस्था यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात आले आहे . बँकेच्या अमृत महोत्सवानिमित्त बँकेच्या वाटचालीची माहिती विशद करणारी विशेष स्मरणिका या निमित्ताने प्रकाशित केला जाणार आहे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा बँकेच्या वतीने साडेसात हजार वृक्षांची लागवड सातारा जिल्ह्यात करण्याचा संकल्प करण्यात आला आहे
मुख्य कार्यालय व विभागीय कार्यालय येथे आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर बँक, अधिकारी सेवकांच्या क्रीडा स्पर्धा, उत्कृष्ट शाखांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन्मानित करणे, गड किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता मोहिमांचे आयोजन ग्राहकांच्या सेवेकरिता अमृत ठेव कलश योजना, बँक आपल्या दारी डिजिटल बँकिंग एनईएफटी आरटीजीएस एटीएम कार्डचे वाटप करणे किंवा क्यूआर कोड विकसित करणे युपीआय मोबाईल बँकिंग सुविधा यांचा प्रसार प्रचार करणे इत्यादी कार्यक्रम होणार आहेत अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ जुलै 2024 मध्ये होणार आहे या निमित्ताने एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून भारतीय रिझर्व बँक व नाबार्डचा अधिकारी तसेच सहकार विभागाचे विशेष निमंत्रित यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे