जिल्हा रुग्णालयातच आरोग्याची ऐशीतैशी..
सातारा (महेश पवार) :
शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय परिसरात सध्या ओंघळ आणि बकालीचे रूप पाहायला मिळत आहे. या जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून काही मीटरवरच गटारगंगा तसेच सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे या परिसरात कचरा, घाण व नको त्या टाकाऊ वस्तूंचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
एकीकडे आरोग्यासाठी नागरिक या जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी धाव घेत असताना या परिसराला आलेले हे ओंगळ रूप पाहून अक्षरशः या परिसरातून ये -जा करणे ही नकोसे वाटते. यावर जिल्हा रुग्णालय तसेच पालिकेने तातडीने उपाय शोधणे गरजेचे आहे .हा परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.