पाण्याअभावी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील नागरीकांना सोडावे लागतेय गाव…
सातारा :
तालुक्यातील ठोसेघर ग्रामपंचायतीच्या अख्तरित येणाऱ्या गायकवाड वाडी येथील लोकांना पाण्यासाठी जिव मुठीत धरून जंगलात असलेल्या झऱ्यावर जाऊन कपडे धुवायला आणि पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावं लागतं आहे. येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे तसेच ग्रामपंचायतीकडे मागणी करून देखील या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना पाण्याची सुविधा केली जात नसल्याने या गावातील अनेक कुटुंब गावापासून लांब शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत.
हा परिसर पावसाळी असून देखील येथील लोकांना पाण्यासाठी जिव मुठीत धरून जावं लागतं यामुळे शासनाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी येथील स्थानिक करत आहेत.
एकीकडे सातारा जिल्ह्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगतात आणि त्यांच्याच जिल्ह्यातील लोकांना पाण्याची सुविधा मिळावी म्हणून मागणी करून देखील पाणी मिळतं नसल्याने गावं सोडून जावं लागतं, याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.