कासचे ओटीभरण; नेते – अधिकाऱ्यांचे पोटीभरण..!
सातारा (महेश पवार):
सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे कास तलाव भरले असून प्रथेनुसार आषाढ महिन्यात कास तलावाचे ओटी भरण आज करण्यात आले. यावेळी सातारा विकास आघाडी च्या महिला नगरसेविका उपस्थित होत्या . तर यावेळी पालिकेचे अधिकारी व नगरसेवक ही उपस्थित होते.
दरम्यान, कास च्या ओटीभरण झाल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि नेते मंडळींनी दारू आणि मटणाचा मनसोक्त आनंद लुटला आणि आकाडी कार्यक्रम उरकला. कास च्या ओटीभरणाच्या नावाखाली नक्की कोणाच्या पैशातून कोणाची खळगी भरली ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पालिकेचा कारभार प्रशासनाच्या ताब्यात असताना देखील सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यक्रम हायजॅक करत महिला अधिकार्यांचा मान हेरावून घेतला.