सलग सातव्यांदा ‘माळ्याची वाडी’मध्ये अरुण कापसे यांची सत्ता
सातारा (महेश पवार) :
सातारा तालुक्यातील माळ्याची वाडी ग्रामपंचायतींवर सलग सहा टर्म अरुण कापसे हे अजिंक्य पॅनलच्या माध्यमातून बिनविरोध निवडून आले , परंतु या निवडणुकीत माळ्याचीवाडी ग्रामपंचायतींची पहिल्यांदाच निवडणूक लागली.
यामध्ये अन्य जागा बिनविरोध झाल्या परंतु सरपंच आणि एक सदस्यांची जागा यासाठी निवडणूक लागली . यामध्ये सरपंच पदासाठी अरुण कापसे हे निवडणूक लढवत होते . यावेळच्या निवडणुकीत विरोधाला विरोध म्हणून उमेदवार देण्यात आला आणि निवडणूक लावण्यात आली परंतु या निवडणुकीत देखील अरुण कापसे हे माळ्याचीवाडी ग्रामपंचायतींवर बहुमताने निवडून आले , आणि सलग सातव्यांदा ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली.
अरुण कापसे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असून परिसरातील हॉटेल व्यवसायामध्ये देखील त्याचे चांगले नाव आहे .